खेळजगत
जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलची राज्य पातळीवर निवड
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित विभागीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर नुकत्याच पार पडल्या.या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या जुनियर व सबजुनियर हॉकी संघांनी आपापल्या गटात लक्षवेधी कामगिरी करत ही स्पर्धा जिंकली आहे. यशस्वी संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेत गौतमच्या विजेत्या जुनिअर हॉकी संघाने अहमदनगर जिल्हयाचे नेतृत्व करत अंतिम सामन्यात सोलापूर शहर संघावर ९–० असा दणदणीत विजय मिळवला तर सब-जुनियर हॉकी संघाने अंतिम सामन्यात सेंट जोसेफ पुणे शहर संघावर ७–२ अशा गोलफरकाने विजय मिळवला.या विजयामुळे गौतमचे दोन्ही विजेते संघ राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे. यातील सब जुनियर हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कुल मध्ये तर जुनियर हॉकी स्पर्धा पुणे येथे होणार आहे. स्पर्धेत दोन्ही गटात पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे.
स्पर्धेत खेळतांना गौतमच्या सब-जुनियर हॉकी संघातील अजय गायके, नकुल घुबे, रोहित चव्हाण, अनिकेत पवार, मुसादिक शेख, सुशांत सोनवणे, अर्जुन परांडे, प्रतिक खडसे तर जुनियर संघातील रितेश पोळ, सुशांत बेडसे, साहिल पटारे, योगेश खेडकर, सार्थक पटारे, प्रमोद दराडे, श्रीयोग भालेराव आदी खेळाडूंनी मोलाची कामगिरी बजावली.
गौतमच्या दोन्ही विजेत्या संघास प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर नीलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, कपिल वाघ सर्व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी क्रीडा शिक्षक तसेच संजय इटकर, रिझवान पठाण, प्रकाश भुजबळ, उत्तम सोनवणे व सुभाष वाणी यांनी मोलाचे योगदान दिले.यशस्वी विद्यार्थ्यांचे
यशस्वी संघाचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव चैताली काळे, सहसचिव स्नेहलताई शिंदे, प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन केले आहे.