खेळजगत
क्रीडा क्षेत्रात तरुणांना अनेक संधी-आ.काळे

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असल्या तरी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्यासाठी खेळाडूंनी क्रीडा क्षेत्राकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता करीअर म्हणून पहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आ. चषक क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण आ.काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना चषक व रोख रक्कमेचे वितरण करण्या आले.स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे: प्रथम पारितोषिक फ्रेंड इलेव्हन,कोऱ्हाळे ३१ हजार रुपये व चषक,द्वितीय पारितोषिक कोपरगाव इलेव्हन,२१ हजार रुपये व चषक,तृतीय पारितोषिक छत्रपती इलेव्हन,पोहेगाव ११ हजार रुपये व चषक, चतुर्थ बक्षीस जय बजरंग क्रिकेट क्लब ५ हजार, तसेच ओझर इलेव्हन,येसगाव इलेव्हन,युवा क्रांती पोहेगाव व चेतक पोहेगाव या संघांना २१०० बक्षीस त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.यावेळी आ. काळे यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,सचिन रोहमारे,नंदकिशोर औताडे,देवेन रोहमारे,प्रदीप औताडे,राजेंद्र औताडे, प्रदीप वाके,वाल्मिक नवले,प्रमोद रोहमारे,जयंत रोहमारे,काका शिंदे,प्रवीण शिंदे,सचिन नवले,दिलीप औताडे,अतुल औताडे,पांडुरंग औताडे,कैलास औताडे,भाऊसाहेब औताडे,शुभम औताडे,अंकित औताडे,अंकुश कांबळे,मयूर वाके आदींसह सहभागी संघाचे खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.