खेळजगत
डॉ.वैशाली ढमाले यांचे कोरोनाने निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सिन्नर तालुक्यातील मूळ रहिवाशी दुशिंगपूर येथील असणारे मात्र आपली वैद्यकीय सेवा पाथरे ग्रामपंचायत हद्दीत देत असलेले डॉ.संदीप ढमाले यांच्या धर्मपत्नी वैशाली संदीप ढमाले (वय-४५) यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा पच्छात पती,एक मुलगा,सासू,सासरे असा परिवार आहे.त्यांच्यावर नाशिक येथील विद्युत वाहिनीचा आधार घेत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
कै. वैशाली ढमाले यांनी व त्यांचे पती डॉ.संदीप ढमाले या जोडप्याने पाथरे परिसरातील नागरिकांची अनेक वर्ष मातृवत आरोग्य सेवा केली आहे.त्यांच्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.उपचारानंतर त्याना बरे वाटले असताना हि दुर्दैवी घटना काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या कुटुंबाचे निळवंडे कालवा कृती समितीच्या निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्याच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.स्व.वैशाली ढमाले यांच्या निधनाने सिन्नर तालुक्यातील वावी पाथरे,दुशिंगपुर,नगर जिल्ह्यातील जवळके,बहादरपूर,आदी परिसरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाने निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक,पत्रकार नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,गंगाधर रहाणे,जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.