खेळजगत
…या पब्लिक स्कूलमध्ये इंटर हाऊस स्पर्धा संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये या वर्षी ११ सप्टेंबर रोजी हॉकी मैदानावर या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीतीत मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

सदर उद्घाटनपर झालेल्या १४ वर्षे वयोगटातील सामन्यात येलो हाउसने ऑरेंज हाऊसचा २-० असा पराभव केला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
शरीराचा व्यायाम होतो,आणि शरीर तंदुरुस्त राहते.मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात.या खेळांमध्ये क्रिकेट,फूटबॉल, उंचउडी, लंगडी,खो-खो,कबड्डी, बॅडमिंटन,बास्केटबॉल,थ्रोवबॉल,पकडापकडी शा विविध खेळांचा समावेश होतो.त्यातून विद्यार्थी घडतात.आणि सहनशील त्याच्या अंगी कायम बाणली जाते.त्यासाठी नुकत्याच गौतम पब्लिक स्कूल येथे सर्व विद्यार्थी चार हाऊस मध्ये विभाजित करून १४ व १७ वर्ष वयोगटात चित्त थरारक सामने खेळवले गेले.यामध्ये हॉकी,क्रिकेट,फुटबॉल,बास्केटबॉल,हॉलीबॉल या मैदानी खेळांच्या स्पर्धा तसेच बुद्धिबळ,वकृत्व, चित्रकला,क्विझ कॉम्पिटिशन आदींचा समावेश होता.
सदर उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य नूर शेख यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून युरो किड्सच्या गोवा व महाराष्ट्र च्या अकॅडेमिक ऑपरेशन मॅनेजर नेहा संघानी,युरो किड्सचे बिझनेस मॅनेजर रोहित सिंग माजी विद्यार्थी विजय जाधव,सुंदरराव काळे व रामराव साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना गौतम पब्लिक स्कूल नवनवीन उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देत असल्या बद्दल प्रमुख पाहुण्या नेहा संघानी यांनी शालेय व्यवस्थापन व प्राचार्य यांचे कौतुक केले व सर्व खेळाडू स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.ग्रीन,ऑरेंज,येलो व ब्लू वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी संचलन करून उपस्थितांची मने जिंकली.विविध वेशभूषेमुळे हॉकी मैदानावर सर्वत्र मनोवेधक रंगीबेरंगी दृश्य दिसत होते.
सदर उद्घाटनपर झालेल्या १४ वर्षे वयोगटातील सामन्यात येलो हाउसने ऑरेंज हाऊसचा २-० असा पराभव केला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
स्पर्धां यशस्वीतेसाठी प्राचार्य नुर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक,रमेश पटारे,इसाक सय्यद,राजेंद्र आढाव,प्रकाश भुजबळ,उत्तम सोनवणे,नसीर पठाण आदी मेहनत घेत आहेत.