धार्मिक
कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा नाही-सुभाष महाराज

न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही.हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते.भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आजही असल्याचे दिसून येत असल्याचे प्रतिपादन सुभाष महाराज जगताप यांनी संवत्सर येथे बोलताना केले आहे.

“निष्काम बुद्धीने प्रयत्न,कष्ट,काम केले पाहिजे.मनुष्याला कर्मे सुटत नाही.ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत.म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे.मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे”-ह.भ.प.सुभाष महाराज जगताप.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली त्यावेली काल्याचे किर्तन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला.भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला.महाभारतात म्हटले आहे की,कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही.हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते.भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे.कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले.कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेसत्तवीस वर्षे होते.महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.निष्काम बुद्धीने प्रयत्न,कष्ट,काम केले पाहिजे.मनुष्याला कर्मे सुटत नाही.ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत.म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे.मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे.समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे.कामासाठी कोणतीही लाचलुचपत,भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला असल्याचे सांगून त्यांनी बालकृष्ण लिलेचे रसभरीत वर्णन केले आहे.त्यावेळी दहीहंडीचा कार्यक्रम महाराजांच्या हस्ते संपन्न झाला आहे.

सदर सप्ताहानिमित्त सात दिवस हरींनाम भजन,कीर्तन,गायन,आदिक कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले आहे.त्यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.त्यासाठी नामदेवराव परजणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रसाद वाटपासह श्रमदान केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सदर प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांसह महिला,संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,ग्रामविकास अधिकारी अहिरे,तलाठी लहाने,महाविद्यालय,माध्यमिक शाळा,प्राथमिक शाळा कर्मचारी वृंद,विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार सरपंच सुलोचना ढेपले यांनी मानले आहे.