जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

मैदानी खेळामुळे खेळाडूंचे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत-गंगूले

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

मैदानी खेळ खेळल्यामुळे खेळाडूंचे शरीर तंदुरुस्त रहाण्याबरोबर त्याला जर कधी अपयश आले ते पचविण्याची शक्ती निर्माण होत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील गंगूले यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आजच्या आधुनिक युगात प्लॅस्टिकसह आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.सदर विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सांभाळून जर आपल्या घरातील व घरा शेजारील प्लास्टिक जर रहिवाशाकडून संकलन करून नगरपरिषदेच्या प्लास्टिक संकलन केंद्रावर जमा केल्यास त्यांना प्रती किलो ५० रुपये दर मिळू शकेल”-शांताराम गोसावी,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आणि नगर परिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे वतीने आयोजित शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पराग संधान,शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री.पटारे,कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,प्रसिद्ध उद्योजक सोमेश कायस्त आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपरिषदेचे प्रभारी व मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे होते.

दरम्यान या शालेय क्रीडा महोत्सवात शहरातील अनेक शाळेचा सहभाग नोंदविला जातो.खो-खो,कब्बडी,लिंबू चमचा इ.मैदानी खेळांचा सहभाग या ठिकाणी केला जात आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम गोसावी यांनी केले आहे त्यात त्यांनी,”आजच्या आधुनिक युगात प्लॅस्टिक्सह आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सांभाळून आपल्या व आपल्या घरा शेजारील प्लास्टक जर रहिवाशाकडून संकलन करून नगरपरिषदेच्या प्लास्टिक संकलन केंद्रावर जमा केल्यास प्रती किलो ५० रुपये दर मिळू शकेलत्याचा फायदा घ्यावा असे आवाहन शेवटी केले आहे.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन पराग संधान,एम.के.आढाव विद्यालयाचे शिक्षक श्री वळवी यांनी केले आहे.उपस्थितांचे आभार बोराडे मॅडम यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close