सामाजिक उपक्रम
कोपरगाव येथील ग्रंथालयास ग्रंथ भेट !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी खा.व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व.सूर्यभान पा.वहाडणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संदर्भ ग्रंथांचा संच वाचनालयास त्यांच्या नावाच्या प्रतिष्ठानच्या वतीने भेटस्वरुप देण्यात आला असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

वाचनालये ही लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्याऐवजी सामान्य लोकांच्या माहितीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केली आहे.ही गरज ओळखून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपले पिताश्री माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे स्मृति प्रित्यर्थ येथील वाचनालयास पुस्तके भेट दिली आहे.
सार्वजनिक ग्रंथालये जगभरातील अनेक देशांमध्ये अस्तित्त्वात आहेत आणि बहुधा शिक्षित आणि साक्षर लोकसंख्येचा एक आवश्यक भाग मानला जातो.सार्वजनिक ग्रंथालये संशोधन ग्रंथालये,शालेय ग्रंथालये आणि इतर विशेष लायब्ररींपेक्षा वेगळी आहेत कारण त्यांचा आदेश एखाद्या विशिष्ट शाळा,संस्था किंवा संशोधन लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्याऐवजी सामान्य लोकांच्या माहितीच्या गरजा पूर्ण करणे आहे.ही गरज ओळखून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपले पिताश्री माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे स्मृति प्रित्यर्थ येथील वाचनालयास पुस्तके भेट दिली आहे.यात विविध विषयांवरील २३ पुस्तके वाचनालयाकडे सुपूर्द केली आहे.त्यांचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर पुस्तकात संचात डाटा ॲनॅलिसिस,प्रोजेक्ट मॅनेजमेंट,बिझनेस मॅनेजमेंट,ॲडव्हर्टायझिंग आदी विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे.व्यवस्थापनशास्त्र,डाटा विश्लेषण, संवादशास्त्र आदी शाखांचा अभ्यास करणाऱ्या वाचक-विद्यार्थ्यांसाठी पुस्तके मोलाची ठरणार आहेत.
दरम्यान या ग्रंथ भेटीबद्दल माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या वतीने आभार मानले आहे.