कला व सांस्कृतिक विभाग
…या देवालयाच्या प्रांगणात छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट देवालयाच्या १६ गुंठे प्रांगणात,भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) २६ ते २८ जुलै २०२२ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यत,तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदर प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, चित्र स्वरूपात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यात १८५७ ते १९४७ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा चित्र आणि माहिती स्वरुपात माडण्यात आली आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे.
या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील केंद्रीय संचार ब्यूरो व श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट,शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन कारगील विजय दिन २६ जुलै,२०२२ रोजी सकाळी ११ वाजता श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (IAS) यांच्या हस्ते होईल.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पत्र सूचना कार्यालय व केंद्रीय संचार ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा प्रदेश) मुंबई च्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा (IIS),श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव,पुणे केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखिल देशमुख, मुंबई प्रकाशन विभाग सहायक संचालक उमेश उजगरे,शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्यासह शिर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी,राहाता तहसीलदार,गटविकास अधिकारी व श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या सर्व विभाग प्रमुखांसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहतील.
या प्रदर्शनानिमित्त शिर्डी शहरात तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या प्रदर्शनाच्या ठिकाणी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या,प्रकाशन विभागातर्फे पुस्तक प्रदर्शन विक्री स्टॉल ठेवण्यात येणार आहे.या पुस्तक प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील यशोगाथा, कला,संस्कृती,वारसा,विज्ञान व क्रीडा आदि विविध विषयांची मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके सवलतीच्या दरात.विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती चित्र स्वरुपात पाहण्यासाठी या छायाचित्र प्रदर्शनास सर्वांनी भेटी द्याव्यात असे आवाहन अहमदनगर केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये,सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी.कुमार व क्षेत्रीय प्रचार सहायक देवेंद्र हिरनाईक यांच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.