धार्मिक
साईबाबा संस्थानला हैद्राबाद येथील भक्ताची मोठी देणगी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्त श्रीमती आणि श्री.भुपाल कामेपल्ली यांनी त्यांचे फर्म ‘के भुपाल इंजिनियर्स अण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा.लि.’च्या वतीने ३१० ग्रॅम वजनाचे सुमारे २० लाख रुपये किंमतीचा नवरत्न आणि मोती जडीत सोन्याचा हार व ११७६ ग्रॅम वजनाचे ३१ हजार ७५२ रुपये किंमतीचे चांदीचे ताट,वाटी,प्लेट व ग्लास श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले. तसेच ०२ लाख रुपये देणगीचा धनादेश यावेळी त्यांनी दिला आहे.
दरम्यान याबाबत साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी समाधान व्यक्त करून उपस्थित भाविकांचा सत्कार केला आहे.
दरम्यान आज महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डॉ.निलमताई गो-हे यांनी शिर्डीत येथून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.