जाहिरात-9423439946
संपादकीय

भिंत पाडण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर चौकाच्या मागील बाजूस असलेल्या ‘हॉटेल रसरंग’ची भिंत पाडण्याच्या कारणावरून दोन गटात लोखंडी गजाचा वापर करत तुफान हाणामारी झाली असून त्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस फिर्यादी प्रतीक संजय साबळे (वय-२९) रा.खडकी यांनी गुन्हा दाखल केला असून विरोधी गटाचे तुषार भाऊसाहेब गायकवाड अनकुटे,ता.येवला यांनीही दुसरा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्राप्त झाला आहे.त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव शहरात विघ्नेश्वर चौकाचे मागील बाजूस ‘हॉटेल रसरंग’ हे असून त्या ठिकाणी पूर्व बाजूस आरोपी प्रतीक सुभाष कदम यांनी असलेली इमारत व तेथील जागा खरेदी करून त्या ठिकाणी नव्या इमारतीचे काम सुरु केले आहे.ते पाडण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी ‘हॉटेल रसराज’ याची मागील बाजूकडील ईशान्य बाजूची भिंत पडली असल्याने त्या बाबत असून फिर्यादी प्रतीक साबळे व अन्य आरोपींनी आरोपींशी जाबसाल जाबसाल केला होता.त्यातून हे महाभारत घडले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी प्रतीक साबळे यांचे कोपरगाव शहरात विघ्नेश्वर चौकाचे मागील बाजूस ‘हॉटेल रसरंग’ हे असून त्या ठिकाणी पूर्व बाजूस आरोपी तुषार भाऊसाहेब गायकवाड यांच्या पूर्वजांनी सन-१९४२ साली बांधलेली इमारत व तेथील भाडेकरूमध्ये करार करून घेऊन त्या ठिकाणी नव्या इमारतीचे काम सुरु केले आहे.ती पाडण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी ‘हॉटेल रसराज’ याची मागील बाजूकडील ईशान्य बाजूची भिंत पडण्याचे काम सुरु असल्याने त्या बाबत असून फिर्यादी प्रतीक साबळे व अन्य आरोपींनी आरोपींशी जाबसाल जाबसाल केला होता.त्यातून वाद वाढून हे भांडण झाले आहे.त्यातून हा वाद शिवीगाळ आणि थेट गजाने मारहाण करण्यापर्यंत गेला असल्याचे समजते.

दरम्यान याबाबत फिर्यादी प्रतीक साबळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”शनिवार दि.११ फेब्रुवारी रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास ‘हॉटेल रसरंग’ जवळ काम सुरु असून सदर कामात त्यांनी आपल्या हॉटेलची भिंत पाडली असून त्या बाबत आपण आरोपी प्रतीक कदम,तुषार भाऊसाहेब गायकवाड,व त्यांचे सोबत असलेले इतर पाच ते सहा जण (नावे माहिती नाही) आदींनी हॉटेलचे कौंटर फोडून नुकसान केले व शिवीगाळ करून लोखंडी रॉडने व लाथा बुक्क्यांनी हातापायावर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.यात फिर्यादी प्रतीक साबळे हा गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिन्ही आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस निरीक्षक एस.सी.पवार,पोलीस नाईक बी.एस.कोरेकर आदींनी भेट दिली आहे.व यातील दोन्ही गटाच्या २६ आरोपीस अटक केली आहे.

दरम्यान यात दुसरा गुन्हा तुषार गायकवाड यांनी दाखल केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आरोपी प्रतीक साबळे,अमितेश साबळे,परिणीत साबळे,रामदास निवृत्ती अभंग व अन्य तीन ते चार जण आदींनी वरील वेळी व ठिकाणी,या ठिकाणी कोणतेही व्यापारी संकुल होणार नाही,तुम्ही आमचे हॉटेल रसरंग जवळ आलेच कसे असे म्हणून फिर्यादीशी वाद घातला व फिर्यादी हे वरील आरोपींना समजावून सांगितले असता प्रतीक कदम यांचे पोटावर,हातावर पायावर मारून जखमी केले आहे.व ‘तुम्ही येथून निधून जा अन्यथा तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत’ अशी धमकी दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.६३/२०२३ भा.द.वि कलम ३२४,१४३,१४७,१४८,१४९,३२३,४४१,४२७,५०४ प्रमाणे दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.उपनिरीक्षक एस.सी.पवार हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close