धार्मिक
…या केंद्रीय मंत्र्यांनी घेतले साईबाबा समाधीचे दर्शन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्रीय अन्न प्रक्रिया व उद्योग राज्य मंत्री ना.प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.सदर प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे,श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत,आमदार राहुल आहेर,विश्वस्त अविनाश दंडवते,सुनिल शेळके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,माजी आमदार कोल्हे व माजी आमदार वैभव पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत,विश्वस्त अविनाश दंडवते व सुनिल शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी ना.राधाकृष्ण विखे पाटील,आमदार राहुल आहेर,आमदार बाळासाहेब मुरकुटे,माजी आमदार वैभव पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.