जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात एकाच रात्री दोन आत्महत्या,खळबळ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या ईशान्नेस साधारण तीन किमी असलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या लगत असलेल्या शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मुलगा राहुल संजय फडे (वय-२७) याने अज्ञात कारणाने आपल्या घरात आत्महत्या केल्याने दुःखात बुडालेल्या त्यांचा पिता संजय रंगनाथ फडे (वय-५०) यांनीही आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघड झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मुलाची आत्महत्येची घटना घडल्यावर त्यास नजीकच्या नागरिकांनी त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांत उपचारार्थ दाखल केले असताना वैद्यकीय अधिकांऱ्यानी त्यास मृत घोषित केले शव विच्छेदनासाठी नातेवाईक तेथे थांबले असता मागे अन्य घरातील सदस्य खाली बसलेले असताना मयत तरुणांच्या पित्याने घराच्या वरच्या मजल्यावर कोणी नाही हि संधी साधत मुलाने ज्या खोलीत जा दोरीने फाशी घेतली त्याच दोरीने मयताच्या पित्याने तणावात येऊन वरच्या मजल्यावर कोणी नाही या संधीचा फायदा घेत आपणही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत संजय फडे यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे.मात्र सध्या कोरोना साथीने या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे.हा व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असावा.त्यातच त्यांचा मुलगा राहुल हा नजीकच्या इंजिनिअरिंग या महाविद्यालयात लॅब असिस्टंट या पदावर कार्यरत होता.एका संस्थेने नुकतेच एका निर्णयानुसार ५० तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याने त्यात मयत तरुणांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या दरम्यान अज्ञात कारणाने संतप्त होऊन तेवढ्या वेळात या महाशयांनी दोर छताला बांधून आपली जीवन यात्रा संपवली होती.जवळचे नातेवाईक वरच्या मजल्यावरील खोलीत जाई पर्यंत उशीर झाला होता.दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेंव्हा हि दुर्घटना उघड झाली आहे.मुलाची आत्महत्येची घटना घडल्यावर त्यास नजीकच्या नागरिकांनी त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांत उपचारार्थ दाखल केले असताना वैद्यकीय अधिकांऱ्यानी त्यास मृत घोषित केले शव विच्छेदनासाठी नातेवाईक तेथे थांबले असता मागे अन्य घरातील सदस्य खाली बसलेले असताना मयत तरुणांच्या अस्वस्थ पित्यानेही आपण आता जगू शकत नाही असे म्हणून गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता.मात्र अन्य नातेवाईकांनीं त्यांना थांबले व समजावून सांगितले होते.मात्र पहाटे सर्व शांत झाल्यावर व नातेवाईकांना आता यांचा राग शांत झाल्याचे पाहून आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर कोणी नाही हि संधी साधत मयताच्या पित्याने मुलाने ज्या दोरीने फाशी घेतली त्याच दोरीने व त्याच खोलीत दुःख असह्य झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी दोन्ही घटनांची अकस्मात मृत्यू रजीष्टर क्रं.अनुक्रमे २५/२०२०, २६/२०२०,सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही.गवसने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close