नगर जिल्हा
आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा इतिहास शौर्याचा-स्मरण
जनशक्ती न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा इतिहास मोठा शौर्याचा असून तो सर्वसामान्यांपर्यंत जावा म्हणून शासनाने त्यांच्या कार्याचा इतिहास पाठ्यपुस्तकातही समाविष्ट केला आहे,असे मत शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले.ते म्हणजे ‘राजे उमाजी नाईक’.
शिर्डी नगरपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २२९ वी शासकीय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी शिर्डी नगरपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा अर्चनाताई कोते,नितीन उत्तमराव कोते,नगरसेवक रवी गोंदकर,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे,पत्रकार जितेश लोकंचंदानी,राजेंद्र गडकरी,न.पं.चे मुख्य लिपिक मुरलीधर देसले,वाचनालय प्रमुख कोते मॅडम व नगरपंचायत अधिकारी कर्मचारी आशोक ढवळे यांनी पुष्पहार पुष्पगुच्छ तसेच पूजन करून जयंती साजरी केली आहे.
यावेळी काकासाहेब डोईफोडे पुढे बोलताना म्हणाले की,”आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक हे एक स्वातंत्र्यसंग्रामातील आद्य क्रांतिकारक आहेत,त्यांच्या जयंती निमित्त त्यांना सर्व शिर्डी शहराच्या वतीने अभिवादन करत आहे.यावेळी नगरसेवक रवी गोंदकर यांनीही आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक हे इंग्रजांविरुद्ध लढणारे पहिले क्रांतिकारक होते,त्यांनी आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन इंग्रजांविरुद्ध पहिले बंड केले.आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांनी सर्वप्रथम इंग्रजांविरुद्ध लढा उभारला व सलग चौदा वर्षे इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केले व त्यांना फाशीची शिक्षा दिली. देश स्वातंत्र्यासाठी प्रथम फासावर जाणारे ते पहिले आद्यक्रांतिकारक ठरले गेले.यांचे राष्ट्रीय स्मारक खडकमाळ पुणे येथे असून जन्मस्थळ भिवंडी तालुका पुरंदर येथे ही शासकीय स्मारक आहे.जेजुरी गडावर त्यांचा पूर्ण कृती भव्य दिव्य पुतळा असून तेथे जयंती निमित्त कार्यक्रम होत आहेत.त्यांची जयंती आज सात सप्टेंबर रोजी शासकीय स्तरावर सर्व देशभर व महाराष्ट्रात साजरी होत आहे.शिर्डी नगरपंचायत मध्येही ती साजरी होताना आनंद होत आहे.त्यांचा कार्याचा येथे आज सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने यापुढे अधिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कोरोनामुळे हा कार्यक्रम साध्या पद्धतीने व शासनाच्या अटी व शर्ती ठेवून,सुरक्षित अंतर पाळत व मुखपट्या लावून हा कार्यक्रम शिर्डी नगरपंचायत मध्ये साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात आला आहे.