जाहिरात-9423439946
धार्मिक

शिर्डीतील साईबाबांची गंगागिरीजी महाराजांनी ओळख करून दिली-महंत रामगिरीजी महाराज

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

शिर्डीतील साईनाथ महाराज यानाची समाजाला ओळ्ख करून देण्यात ज्यांनी अहंम भूमिका निभावली ज्यांनी संत जोग महाराज,तुकाराम महाराज खेडलेकर याना परमार्थाला लावण्यात सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांनी महत्वाचे काम केले होते असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी नुकतेच कोकमठाण येथे आज दुपारी बोलताना केले आहे.

देशभरात प्रसिद्ध असलेल्या सद्गुरू गंगागीरीजी महाराज यांच्या,”शतकोत्तर अमृत महोत्सवी अखंड हरींनाम सप्ताह’ कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे दि.०२ ऑगष्ट पासून संपन्न होत असून त्याचा ध्वजारोहण सोहळा महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते गुरुवार दि.२१ जुलै सकाळी ११.३० वाजता संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

यावर्षी शतकोत्तर अमृत वर्षाचा सप्ताह श्री क्षेत्र कोकमठाण येथे संपन्न होत आहे.त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.आज त्याची तयारी पाहायला मिळाली आहे.कोकमठाण येथे १९७४ नंतर यावर्षीचा सप्ताह चौथ्यांदा संपन्न होत आहे.यावेळी कर्मवीर काळे व संजीवनी सहकारी साखर कारखान्यानी प्रत्येकी ५१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे.तर १९७४ साली संपन्न झालेल्या सप्ताहाचा हिशेब आणि रक्कम यावेळी महंत रामगिरीजी महाराज यांचेकडे सुभाष थोरात,भाऊसाहेब रक्ताटे यांनी अर्पण करण्यात आला आहे मात्र रक्कम गुलदस्त्यात ठेवली आहे.

‘अखंड हरिनाम सप्‍ताह’ हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे.इंग्रज राजवटीत ग्रामस्थांची अन्नाविना उपासमार होत असलेल्या प्रतिकूल कालखंडात,”लेणे को हरींनाम और देणे को अन्नदान” हा जप करत तत्कालीन महंत सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांनी सुरु केलेल्या या वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्‍ताहाला मोठे महत्त्व आहे.त्यामुळे या काळात हा सप्ताह नावारूपास आला आहे.त्यांच्या नंतर हि धुरा महंत दत्तगिरीजी महाराज,सद्गुरू नाथगिरीजी महाराज,महंत सोमेश्वरगिरीजी महाराज,व त्यानंतर त्यांनी ती महंत नारायणगिरीजी महाराज यांचेकडे सोपवली होती.दि.१९ मार्च २००९ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले होते.त्या नंतर हि धुरा महंत रामगिरीजी महाराज यांनी यशस्वीपणें सांभाळली आहे

सदर प्रसंगी हा सप्ताह एकूण १६५ एकर परिसरात संपन्न होत आहे.त्यासाठी ग्रामस्थ व भाविक भक्तांचे श्रमदान अभिप्रेत आहे.सदर ठिकाणीही आलेल्या भाविकांना चोवीस तास पाणी.पावसामुळे स्वयंपाक करण्यासाठी व भजनी मंडळासाठी मंडप असतोच पण यावेळी २००-२५० या आकारातील दोन मंडप जेवणासाठी प्रथमच तयार करण्यात येत आहे हे यातील महत्वाचे वैशिष्ट्य आहे.भाविकांसाठी आमटी आणि भाकरी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना आधुनिक शेती शिक्षण मिळण्यासाठी व आधुनिक साहित्याची माहिती मिळण्यासाठी भाविक शेतकऱ्यांसाठी,”आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन” आयोजन करण्यात आले आहे.त्याचे भूमिपूजन रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.

सदर प्रसंगी श्री काशीविश्वनाथ महादेव ट्रस्टचे रामेशगिरीजी महाराज,ह.भ.प.मधुकर महाराज,विवेकानंद जी महाराज,श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,ओम शांतीच्या सरला दीदी,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संजीवनी कारखान्याचे संचालक विवेक कोल्हे,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशवराव भवर,सुरेश चव्हाणके,कोपरगाव पंचायत समितीच्या माजी सभापती अनुसया होन,मधुकर टेके,भाजप कोल्हे गट अध्यक्ष साहेबराव रोहोम,सप्ताह आयोजन समितीचे अध्यक्ष सुधाकर रोहोम,भाजप माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात,सेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे,संजय काळे,कडूभाऊ काळे,कमलाकर कोते,माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी,श्री अभंग,संचेती नंदू संचेती,साहेबराव सोमसे,भाऊराव सोमासे,तुकाराम गोंदकर,गुरुसेवा ब्रास बँडचे संचालक चौस,आकाश नागरे,कोकमठाण ग्रामपंचायत सरपंच संतोष जाधव,अविनाश गलांडे,उषाताई जोशी,संभाजी रक्ताटे आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे व विवेक कोल्हे यांनी कारखाना अध्यक्ष निवडणुकीमुळे लवकरच कार्यक्रमातून काढता पाय घेतला असल्याचे दिसून आले आहे.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सराला बेटाला मोठे अध्यात्मिक महत्व आहे.श्री क्षेत्र लासुर येथील देवी मंदिरात त्यांनी आपल्या कीर्तनाला तमाशातील नागरिकांना खेचून आणले होते.तत्कालीन महापुरुषांनी नागरिकांत मोठी अध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली होती.अखंड भजन ही या सप्ताहाची मोठी परंपरा आहे.हा सप्ताह विश्व विक्रमी असून ग्रीनीच बुकात याची नोंद झालेली आहे.कोरोना काळात सप्ताह बाहेर होऊ शकला नाही.६४ लोकांत सप्ताह सराला बेटात संपन्न झाला आहे.गंगागिरी महाराज यांचे या सप्ताहासाठी मोठे आशीर्वाद आहे.हा सप्ताह केवळ कोकामठाणचा नाही तर परिसरातील पंचक्रोशीतील आहे त्यांच्या सहकार्यांची गरज लागणार आहे.सेवा हे ज्ञानाचे द्वार मानले जाते.ज्ञानरुपी धन गुप्त धन आहे.त्याला सांभाळण्याची संरक्षणाची गरज नाही असेही त्यांनी सांगून नगर,संभाजीनगर,नाशिक जिल्ह्यातील भाविक भक्तांना याचा लाभ घेण्याचे आवाहन शेवटी केले आहे.

कान्हेगाव येथील गोदावरी रिफायनरी ऑरगॅनिक कंपनीच्या वतीने समीर सोमैय्या यांनी ०७ लाख रुपयांची तरशिर्डी येथील साई सेवा हेल्पिंग हँडच्या वतीने ०२ लाख ५१ हजारांचा तर किरण अशोक देवकर यांनी आपल्या वडिलांच्या समरणार्थ ३१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान महंत रामगिरीजी महाराज यांचेकडे सुपूर्त केला आहे.त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी सप्ताहाची मागणी केली आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज,विवेकानंदजी महाराज,सरला दीदी,विवेक कोल्हे,राजेश परजणे,कमलाकर कोते,वैजापूरचे संतोष जाधव,सप्ताह समिती अध्यक्ष सुधाकर रोहोम,कोपरगाव बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे,शरद थोरात,आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजश्री पिंगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संभाजी रक्ताटे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close