धार्मिक
कोपरगावात गुरुपूर्णिमा उत्सव होणार संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावात गुरुपूर्णिमा उत्सव होणार संपन्न
कोपरगाव शहरातील जुनी गंगा येथील श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने बुधवार दि.१३ जुलै रोजी राष्ट्र संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु पूर्णिमा उत्सव संपन्न होणार असल्याची माहिती आश्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी दिली आहे.
हिंदू धर्मात गुरु पौर्णिमा या उत्सवास ‘व्यास पौर्णिमा’ असेही म्हणतात कारण यादिवशी वेदव्यास या थोर ऋषीचा जन्म झाला होता.त्यांना हिंदू परंपरेतील सर्वात प्रभावशाली गुरू आणि गुरु-शिष्य व्यवस्थेचे प्रतीक मानले जाते.असे मानले जाते की या दिवशी त्याने आपली प्रसिद्ध रचना ब्रह्मसूत्र लिहिले.त्यांचे शिष्य या दिवशी या सूत्रांचे पठण करतात आणि त्यांच्या कार्याबद्दलची श्रद्धा आणि आदर दर्शविण्यासाठी हा उत्सव श्री क्षेत्र कोपरगाव येथे संपन्न होत आहे.
हिंदू धर्मात गुरु पौर्णिमा या उत्सवास ‘व्यास पौर्णिमा’ असेही म्हणतात कारण यादिवशी वेदव्यास या थोर ऋषीचा जन्म झाला होता.त्यांना हिंदू परंपरेतील सर्वात प्रभावशाली गुरू आणि गुरु-शिष्य व्यवस्थेचे प्रतीक मानले जाते.असे मानले जाते की या दिवशी त्याने आपली प्रसिद्ध रचना ब्रह्मसूत्र लिहिले.त्यांचे शिष्य या दिवशी या सूत्रांचे पठण करतात आणि त्यांच्या कार्याबद्दलची श्रद्धा आणि आदर दर्शविण्यासाठी हा उत्सव संपन्न होत आहे.कोपरगाव बेट येथेही हा उत्सव संपन्न होत आहे.त्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
सदर प्रसंगी उपाध्यक्ष विलास कोते,अंबादास अंत्रे,त्र्यंबक पाटील,रामकृष्ण कोकाटे,अनिल जाधव,आशुतोष पाणगव्हाने,संदीप चव्हाण,अतुल शिंदे,शिवनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”या दिवशी पहाटे ०४ वाजता संत जनार्दन स्वामी यांच्या समाधीची महापूजा,सकाळी ०५ वाजता नित्यनियम विधी,सकाळी ०७ वाजता सत्संग प्रवचन,सकाळी ०९ वाजता बाबाजींची पादुकांची पूजा मूर्तीची षोडपचार महापूजा,दुपारी १२ वाजता साधू संतांचे प्रवचन संपन्न होणार आहे.त्या नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करणार आहे.सदर प्रसंगी रमेशगीरी महाराज,स्वामी मधूगिरीजी महाराज,स्वामी माधवगिरीजी महाराज,स्वामी दत्तगिरीजी महाराज,भाऊ पाटील त्र्यंबक,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.दरम्यान या पूजेचे पौरोहित्य प्रशांत शिखरे हे करणार आहे.सायंकाळी ०७.३० वाजता जनार्दन स्वामींच्या पालखीची भव्य मिरवणूक संपन्न होणार आहे.सदर उत्सवासाठी विद्युत रोषणाई करण्यास प्रारंभ केला आहे.