धार्मिक
कोपरगाव तालुक्यात नर्मदेश्वर महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या जेऊर पाटोदा हद्दीत रामदास केकाण यांचे वस्तीवर नुकताच श्री गणेश मूर्ती व नर्मदेश्वर महादेव,पार्वती देवी आदींचा प्राण प्रतिष्ठा सोहळा साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
कैलास पर्वतापासून ते रामेश्वरमपर्यंत अनेक शिवमंदिरांमधील रहस्ये अद्भूत आणि अचंबित करणारी आहेत.अशाच नर्मदेश्वर महादेव मंदिराची उभारणी व त्यांची प्राणप्रतिष्ठा नुकतीच जेऊर पाटोदा येथील रामदास केकाण यांच्या वस्तीवर करण्यात आली आहे.त्यासोबत गणेश मूर्ती,पार्वतीमाता मूर्ती,गोसावी बाबा व मुंजोबा मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.भारतीय संस्कृती,परंपरा यांकडे जग आदराने पाहते. कारण प्राचीन,पुरातन काळापासून चालत आलेल्या या पद्धती मानवाचे आरोग्य,विचार,संस्कार,आचार यांना समृद्ध करणाऱ्या अशाच आहेत.भारतात बहुधर्मीय नागरिकांचा देश आहे.असे असले तरी एकमेकांच्या संस्कृती,परंपरांचा आदर करून सण-उत्सव साजरे केले जातात.आपल्याकडील बहुतांश सण किंवा उत्सव हे निसर्गचक्र,ऋतुचक्र यांच्याशी निगडीत आहेत.कैलास पर्वतापासून ते रामेश्वरमपर्यंत अनेक शिवमंदिरांमधील रहस्ये अद्भूत आणि अचंबित करणारी आहेत.अशाच नर्मदेश्वर महादेव मंदिराची उभारणी व त्यांची प्राणप्रतिष्ठा नुकतीच जेऊर पाटोदा येथील रामदास केकाण यांच्या वस्तीवर करण्यात आली आहे.त्यासोबत गणेश मूर्ती, पार्वतीमाता मूर्ती,गोसावी बाबा व मुंजोबा मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमानिमित्त पहिल्या दिवशी पंचांग कर्म,कलश यात्रा,मूर्ती जलाधिवास,तर दुसऱ्या दिवशी धान्यदिवास,शय्या दिवास,अग्नी स्थापन,हवन,तर तिसऱ्या दिवशी नर्मदेश्वर,गणेश,पार्वती माता मिरवणूक,मूर्ती अभिषेक मूर्ती,हवन,मूर्ती संस्कार,प्राण प्रतिष्ठा,ध्वज स्थापना,कलशारोहन,यज्ञ पूर्णाहुती,आरती आदी कार्यक्रम करण्यात आले आहे.
दरम्यान शेवटच्या दिवशी महंत रमेशगिरी महाराज,अरविंदगिरी महाराज,प.पू.उंडे महाराज,उज्जेन येथील संदीपनी आश्रमातील आचार्य निरज उपाध्याय यांचेसह अनेक संत-महंत उपस्थित होते.त्यांचे मार्गदर्शन,सत्संग आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी महाकाल आरती करण्यात आली व शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे.