कोपरगाव तालुका
लोकशाहीर साठे पुतळ्यासाठी नगराध्यक्ष वहाडणे यांचे मोठे योगदान-कौतुक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या पूर्णाकृती पुतळा बरोबरच आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविला असून त्यात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राहाता येथील पत्रकार रामभाऊ पिंगळे यांनी केले आहे.
“आपण नगराध्यक्ष हे पद जनतेने दिल्यामुळे जनतेची प्रामाणिक सेवा करणे हे व्रत हाती घेतले असू न सत्ता असो या नसो मात्र एखांद्याला दिलेला शब्द पूर्ण करण्यास बांधील आहोत तर आपल्याला प्रसिद्धी पेक्षा काम करण्यातच खरा आनंद आहे”-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारसरणीचे होते.त्यांच्या पुतळ्याच्या आणण्यावरून कोपरगावात अनेक वादंग झाले त्यामुळे अनेक वेळा या पुतळा वाहनात ठेऊन त्याचा निर्णय बदलावा लागला होता.मात्र कोपरगाव शहरात केवळ श्रेयवादावरून या पुतळ्याचे गेली अनेक वर्षे अनावरण टाळले जात होते मात्र आता त्याला रविवार दि.२६ डिसेंबर रोजी अकरा वाजता मुहूर्त लाभला होता.त्या साठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे मोठे योगदान दिले आहे.त्यासाठी पुर्णाकृती पुतळा समिती स्थापन केली होती व सर्वांचा समन्वय साधला होता.त्यामुळेच हा पुतळा बसवणे शक्य झाले आहे.गत पंधरा वर्षांपासून तो शिल्पकाराच्या गोदामात धूळ खात पडून होता.मात्र त्याला दिशा देण्याचे काम नगराध्यक्ष वहाडणे यांनी केले होते.असे गौरवोद्गार पिंगळे यांनी शेवटी काढले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव स्मारक समितीचे अध्यक्ष सुखदेव जाधव,संजय साळवे,अशोक पगारे,परशुराम साळवे, अनिल जाधव,बिपीन गायकवाड,सोमनाथ गायकवाड,दिनेश अहिरे,राम गोसावी आदींच्या हस्ते पुष्प गुच्छ नगराध्यक्ष वहाडणे यांचा सम्मान करण्यात आला आहे.
यावेळी स्मारक समिती अध्यक्ष सुखदेव जाधव म्हणाले की,”वहाडणे यांनी सर्व समाजातील समाज बांधवांच एकमत करून स्मारक समितीची स्थापना केली स्मारक समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी वास्तू कला विभाग आदी परवानग्या मिळण्यासाठी सर्वाना बरोबर घेऊन पाठपुरावा केला आहे. कोपरगाव च्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला म्हणून त्यांचा आम्ही स्मारक समितीच्या वतीने सत्कार केला आहे.
लहुजी सेना जिल्हाध्यक्ष परशुराम साळवे म्हणाले की,”गेल्या वीस वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात अण्णाभाऊ च्या पुतळाच्या ठिकाणी भव्य पूर्णा कृती पुतळा व्हावा म्हणून लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले होते.त्या मागणी व सर्व सामाजिक संघटनेची मागणी आज पूर्ण झाल्याने आपल्याला आत्मिक समाधान लाभले असून ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी लढा दिला त्यांच्या लढ्याला उशिरा का होईना यश आले म्हणून सत्कार करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले सर्व समाजाच्या घटकांनी या पुढे मतभेद विसरून सामाजिक संघटनेचे मतभेद बाजूला ठेवून चांगल्या कामाला एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अशोक पगारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय साळवे यांनी मानले आहे.