धार्मिक
श्री साईबाबांचे चरित्र हे अद्भुत कथांनी भरलेले-ह.भ.प.उद्धव महाराज
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री सद्गुरू साईबाबांचे चरित्र हे अद्भुत कथांनी भरलेले आहे.भक्तांना विविध रूपात साईबाबांनी दर्शन दिले आहे.नामस्मरणाने साईबाबांच्या कृपाशीर्वादाने त्याचा स्पर्श भक्तांना होऊ शकतो असे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी गुहा येथे बोलताना केले आहे.
“गुहा परीसराच्या वैभवात या साईमंदिराने भर पडली आहे.हे साईमंदिर अध्यात्मिक प्रगतीस चालना देईल.मुंबई येथील शिल्पकार राजू तालीम यांनी इटालियन मार्बल मध्ये साईबाबांची मूर्ती बनवली असून तिचे वजन साडे पाचशे ते सातशे किलो आहे”-ना.प्रसाद तनपुरे,राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील वाबळे वस्ती येथे बांधलेल्या साईबाबा मंदिराच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा समारंभात काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.
माजी खासदार प्रसाद तनपुरे,विकास रुणवाल महाराज,मान्यवरांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.
एक दिवस आधी मंदिर ते गुहा गावातून साई बाबा मूर्तीची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.साईबाबांच्या गजराने गुहा नगरी दुमदुमून गेली.सात दिवस झालेल्या साईचरित्र पारायण सोहळ्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला सहभागी झाल्या होत्या.
प्राणप्रतिष्ठा समारंभात माजी खा.प्रसाद तनपुरे म्हणाले,”शिर्डी संस्थानने आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उभारून अधिकाधिक गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात.तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देऊन उद्याची भावी पिढी अधिकाधिक सुदृढ व सशक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत.
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले,”गुहा परीसराच्या वैभवात या साईमंदिराने भर पडली आहे.हे साईमंदिर अध्यात्मिक प्रगतीस चालना देईल.
मुंबई येथील शिल्पकार राजू तालीम यांनी इटालियन मार्बल मध्ये साईबाबांची मूर्ती बनवली असून तिचे वजन साडे पाचशे ते सातशे किलो आहे.
माजी आ.चंद्रशेखर कदम,माजी आ.भाऊसाहेब कांबळे,नगराध्यक्षा राहुरी नगरपालिका डाँ.उषाताई तनपुरे,श्री.साईबाबा संस्थान उपाध्यक्ष ॲड.जगदीश सावंत,डॉ.एकनाथ गोंदकर,राहुल कणाल,महिंद्र शेळके,अविनाश दंडवते,सचिन गुजर,अनुराधा आदिक,सिताराम पा.ढुस आदी मान्यवर यावेळी हजर होते.वाबळे परिवाराच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला लाभ घेतला आहे.सुरेश वाबळे यानी स्वागत केले.उपस्थितांचे आभार प्रा.विशाल वाबळे याना मानले आहे.