धार्मिक
.. या तीर्थक्षेत्रात आरक्षण करूनच दर्शन सोयीस्कर-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सध्या दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक १६ नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी,शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन सर्व साईभक्तांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.आगामी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांनी ऑनलाइन दर्शन पास घेऊनच दर्शनाला यावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना विषाणुच्या पार्दुभावामुळे श्रीं च्या दर्शनाकरीता ठरावीक संख्येनेच मंदिरात प्रवेश दिला जात असल्यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्यथा गैरसोय होऊ शकते-कान्हूराज बगाटे,मुख्य कार्यकारी अधिकारी.
आगामी नूतन वर्षाच्या स्वागताची जय्यद तयारी सुरु असून संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे नाताळ सुट्टी,चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शुक्रवार दिनांक २५ डिसेंबर २०२० ते रविवार दिनांक ०३ जानेवारी २०२१ याकालावधीत गर्दी होवु नये म्हणुन साईभक्तांनी शिर्डी येथे श्रीं चे दर्शनाकरीता येतानी संस्थानच्या online.sai.org.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन दर्शन पास घेवुनच यावे. ऑनलाईन पास निश्चित झाल्यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे.तसेच अधिक माहितीसाठी संस्थानच्या www.sai.org.in या संकेतस्थळावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तरी कोरोना विषाणुच्या पार्दुभावामुळे श्रीं च्या दर्शनाकरीता ठरावीक संख्येनेच मंदिरात प्रवेश दिला जात असल्यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्यथा गैरसोय होऊ शकते.तसेच मास्कचा वापर न करण्या-या साईभक्तांना,१० वर्षाखालील मुलांना,गरोदर स्त्रिया व ६५ वर्षावरील व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.याशिवाय मंदिरात फुलं,हार व इतर पूजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे.याबरोबरच जे साईभक्त आजारी आहेत अशा साईभक्तांनी दर्शनाकरीता येऊ नये असे सांगुन पदयात्री साईभक्तांनी व पालखी मंडळांनी पालखी शिर्डी येथे आणू नये असे आवाहन ही कान्हूराज बगाटे यांनी केले.