जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरातील चोऱ्यांचे सत्र थांबेना,कोपरगावात तीन गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपली चौर्यलीला दाखवली असून सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.तर दुसऱ्या दोन घटनेत कोपरगाव बस स्थानक येथून मुर्शतपुर येथील विशाल प्रकाश शिंदे यांची दुचाकी तर संजीवनी कारखाना पार्किंग मधून चांदेकासारे येथील कर्मचारी मच्छीन्द्र भाऊराव होन आदी दोन ठिकाणच्या अनुक्रमे २५ व १५ हजार असे ४० हजारांच्या दोन दुचाक्यांची चोरी केली आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

वर्तमानात रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायर व दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला प्रताप दाखवला होता.या घटना वास्तविक तत्कालीन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या कार्यकाळातील असून त्यांच्या जागी आता पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी कार्यभार स्वीकारला असून आता ते या चोरट्या विरुद्ध काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात दुचाकी व चार चाकी चोरांचा सुकाळ झाला असून अनेकांची वहाने चोरीस गेल्याचे अनेक गुन्हे दि.२२ फेब्रुवारी रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत.गत सप्ताहात तालुका पोलिसांनी ट्रॅक्टर चोरीची संगमनेर तालुक्यातील एक टोळी पकडली असून त्यांच्याकडून चार ट्रॅक्टर हस्तगत केले असून अजून चार ट्रॅक्टर हस्तगत केले आहे.मात्र कोपरगाव शहर पोलिसांचे मात्र नेमके उलटे सूत्र दिसत असून चोरी झालेली वहाने जप्त झाल्याची घटना दुर्मिळ मानली पाहिजे.
वर्तमानात रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायर व दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून पोलिसांना नाक खाजवून दाखवले आहे.त्यामुळे वहान धारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटना वास्तविक तत्कालीन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या कार्यकाळातील असून त्यांनी आता तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे.तर त्यांच्या जागी आता नव्याने श्रीगोंद्यावरून आलेले पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पदभार स्वीकारला आहे.त्यामुळे आता त्यांना या गुन्हे तपासाचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.ते याबाबत काय कार्यवाही करणार हे अल्पावधीत समजणार आहे.

दरम्यान यातील पहिली घटना हि कोपरगावचे उपनगर असलेले सुभद्रानगर येथील तेथील रहिवासी पी.विल्यम एस.पी.चंद्रन रा.साईसुर्या बंगला येथे घडली आहे.ते आपल्या मूळगावी छत्तीसगड येथे दि.०६ फेब्रुवारी रोजी आपल्या कुटूंबास भेटण्यास गेले होते.ते आपले काम आटोपून आपल्या कोपरगाव येथील निवासात पहाटे साधारण ०४ वाजेच्या सुमारास आले असता त्यांनी आपले घर उघडले व ते ताजेतवाने होण्यासाठी त्यांनी आपले गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची व ८७ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी व ३० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या,व पैशाचे पाकीट असा एकूण ०१ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज काढून त्या खिडकीजवळ असलेल्या टेबलवर ठेवला होता.व ते आपल्या स्वच्छता गृहात गेले असता ताजेतवाने होऊन परत बाहेर आले असता ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या चीजवस्तू ठेवल्या होत्या त्या ठिकाणी त्यांना त्या आढळून आल्या नाहीत.त्यांनी त्या वस्तू व सोने-नाणे शोधून पाहिले असता ते सापडले नाही.

फिर्यादी यांना मराठी भाषा येत नसल्याने सदर बाब त्यांनी नंतर काही दिवसांनी आपल्या हिंदी भाषिक मित्राच्या लक्षात आणून दिली होती.त्यामुळे त्यानी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन नूकतीच दि.०३ मार्चं रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा क्रं.१०१ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला आहे.त्याचा तपास पोलिस निरीक्षक ढिकले याचे मार्गदर्शनाखाली पो.ह.दिलीप तिकोणे हे करत आहे.

दरम्यान दुसऱ्या घटनेत फिर्यादी हे विशाल शिंदे (वय-३६) हे मुर्शतपुर येथील रहिवासी असून ते कालांश उद्योग येथे खाजगी चालकाची नोकरी करत आहेत.त्यांची २५ हजार रुपये किमतीची व काळ्या रंगाची होंडा स्प्लेंडर हि दुचाकी घेऊन ते दि.१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास कोपरंगाव येथील बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी आपली दुचाकी पार्क करून ते आपल्या संतोष दिघे या मित्रांसमवेत येवला नाका या ठिकाणी गेले असता ते आपले काम अटोपुन रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास आले असता त्या ठिकाणी त्यांची दुचाकी उभी असलेली त्यांना दिसली नाही.त्यांनी इतरत्र तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.अखेर वैतागून त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा क्रं.१००/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान तिसरी घटना हि कोपरगाव नजीक असललेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पार्किंग मध्ये घडली असून फिर्यादी मच्छीन्द्र होन हे चांदेकसारे येथील रहिवासी असून ते संजीवनी सहकारी कारखान्यात शेतकी विभागात कारकून पदावर नोकरी करत आहे.त्यांची १५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची ‘होंडा पॅशन’ दुचाकी (क्रं.एम.एच.१७ ए.पी.८७५१) हि असून ती त्यांनी दुपारी ०१ वाजता संजीवनी कारखान्याच्या पार्किंगमध्ये लावली होती.व ते आपल्या कर्तव्यावर गेले असता ते सायंकाळी ०५ वाजता आपली सुट्टी झाल्यावर आले असता त्या ठिकाणी त्यांची उभी करून ठेवलेली दुचाकी आढळून आली नाही.त्यांनी तिंचा अन्यत्र शोध घेऊन पहिला असता ती त्यांना ती मिळून आली नाही.अखेर यांनी वैतागून त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा क्रं.१०३ /२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास नूतन पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू पुंड हे अधिकारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close