कोपरगाव तालुका
कोपरगावात पवन…या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १४ लक्ष ९० हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील कविवर्य वामनदादा कर्डक मार्ग लुंबिनी बुद्ध विहाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ शिर्डी संस्थान चे अध्यक्ष व कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले आहे.
बुद्ध धम्म प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष व सदस्य भिक्खु आनंद सुमन सिरी व भिक्खु काश्यप यांच्या प्रयत्नातून विहार परिसराचा विकास व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले आहे.
यावेळी आ.काळे यांनी बुद्ध विहारात बुद्ध मूर्तीची विधीवत पूजा करून दर्शन घेतले.तसेच बुध्द धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट व बुद्धिस्ट यंग फोर्स च्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी भिक्खु कश्यप,मुख्याधिकारी शांताराम गोसावी, ट्रस्टचे अध्यक्ष रंभाजी रणशुर,विश्वस्त अजय विघे,विश्वस्त माधव त्रिभुवन,विश्वस्त नानासाहेब रणशुर,विश्वस्त प्रल्हाद जमधडे,विश्वस्त रमेश हेगडमल,सदस्य रमेश मोरे,वसंत गाडे,शंकर घोडेराव,अशोक जमधडे,विलास गवळी,अनिल नवगिरे,गणेश पवार,बुद्धिष्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन,राजेंद्र उशीरे,संजय दुशिंग,मनोज शिंदे, नितीन शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,आर.पी.आय चे सुनील मोकळ,दिनकर खरे,रमेश गवळी,फकीर कुरेशी,डॉ. तुषार गलांडे,सचिन परदेशी,राहुल देवळालीकर,प्रकाश दुशिंग, रावसाहेब साठे,मायादेवी खरे,अॅड. नितीन पोळ,सुरेश मोकळ,किरण बागुल,राजेंद्र पगारे,आदी उपस्थित होते.