जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-( वार्ताहर)
पूर्णिमा उपवासास हिंदू धर्मात एक महत्त्वाचे स्थान आहे .दर वर्षी बारा पौर्णिमा असतात.जेव्हा अधिक मास येतो तेव्हा त्यांची संख्या तेरा पर्यंत वाढते.तिला कार्तिक पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. त्रिपुरी पौर्णिमा किंवा गंगा स्नान करतात म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हटले गेले आहे कारण या दिवशी भगवान भोलेनाथ यांनी त्रिपुरासुर नावाचे महाभयानक राक्षसाचा वध केला.व नंतर त्याला उशाप दिल्याने त्याची पूजा करण्याचा मान मिळाला. त्या वेळपासून हा दिवस त्रिपुरी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा म्हणून ओळखले जाते.
लोहगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात काकड आरती संपन्न होत आहे.दिवाळी सुरू झाल्याचा आनंद गावकरी मंडळींना होत आहे. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरा पौर्णिमा अशा एक महिनाभर कार्तिकस्नान पर्वाचा आरंभ झाला आहे.बेटाच्या परंपरा नुसार काकड भजन करण्यात येते. या काकड आरतीत गावातील सर्व भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी मोठ्या भक्तिमय वातावरणात सहभागी होतात.कोरानाचे संकट असल्यामुळे सर्व गोष्टीचे तंतोतंत पालन करून काकड आरती आरंभ होत आहे.