जाहिरात-9423439946
धार्मिक

…या शहरात झुलेलाल जयंती उत्साहात साजरी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगावसह राज्यातील सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची १०७६ वि जयंती कोपरगाव शहरात मोठया  उत्साहात नुकतीच साजरी झालीव आहे.कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळा येथे दोन दिवस धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

समाज मान्यतेनुसार,संत झुलेलाल हे वरुण देवाचे अवतार मानले जातात.१० व्या शतकात सिंध प्रांतात (आता पाकिस्तान) सिंधी हिंदूंना होणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी वरुणाचे (जलदेवता) रूप असलेल्या झुलेलाल यांनी अवतार घेतला,असे सांगितले जाते.त्यांची जयंती कोपरगावसह देशभर मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.


    दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी चेटीचंद आणि झुलेलाल जयंती साजरी केली जाते.सिंधी समाजासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे,कारण या दिवसापासून सिंधी हिंदूंचे नवीन वर्ष सुरू होते.चेटीचंदच्या दिवशी सिंधी समाजातील लोक भगवान झुलेलालची भक्तिभावाने पूजा करतात.मान्यतेनुसार,संत झुलेलाल हे वरुण देवाचे अवतार मानले जातात. १० व्या शतकात सिंध प्रांतात (आता पाकिस्तान) सिंधी हिंदूंना होणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी वरुणाचे (जलदेवता) रूप असलेल्या झुलेलाल यांनी अवतार घेतला,असे सांगितले जाते.त्यांची जयंती कोपरगावसह देशभर मोठ्या  उत्साहात संपन्न होत आहे.

  कोपरगाव येथे पहिल्या दिवशी झुलेलाल देवता-बेहराणा साहेब यांची स्थापना समाजाचे अध्यक्ष तुलसीदास खुबाणी यांचे हस्ते करण्यात आली.त्या निमित्ताने मोटारसायकल रॅली सह विविध कार्यक्रम संपन्न झाले आहे.रॅलीचे नियोजन युवा मंच अध्यक्ष अमित शर्मा,उत्सव कमिटी अध्यक्ष धिरज कराचीवाला,गणेश नोतवाणी,निखिल खुबाणी,हिमांशू खुबाणी,आदींनी केले होते.


   दरम्यान उपस्थित असलेल्या भाविकांना भंडारा ठेवण्यात आला होता.यावेळी संस्थापक अध्यक्षा शालिनी खुबानी,अध्यक्ष कशीश  शर्मा,हेमा खुबानी,सिमरन खुबानी,दिशा खुबानी,नेहा काराचीवाला,प्रिया काराचीवाला,रेणू कृष्णांनी,मनीषा कृष्णांनी,कीर्ती कृष्णानी,मंजु शर्मा, पुजा शर्मा, दिव्या शर्मा,आकांक्षा शर्मा,काव्या शर्मा,मेहक शर्मा, गुंजन आर्य,वर्षा आर्य,पुनम आर्य,प्रिया वलीरामाणी,देशना खुबानी आदी महिला व मुली बहुसंख्येने होते.
   
यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,सतीश कृष्णाणी आदींचा सत्कार करण्यात आला आहे तर तुलसीदास खुबाणी,मोहन काराचीवाला,भागचंद शर्मा,किसन शर्मा,प्रकाश वलीरामानी आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी सूत्रसंचालन चेतन खुबाणी यांनी केले तर आभार मनोहर कृष्णांनी यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close