जाहिरात-9423439946
धार्मिक

“मुबारक हो हज का सफर; दुआवो मे याद रखना”-…या नेत्याच्या शुभेच्छा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातून पवित्र हज यात्रेस जाणाऱ्या भाविकांना कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी  “मुबारक हो हज का सफर; दुआवो मे याद रखना” म्हणत सुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  “आ.आशुतोष काळे हे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार होणार आहे.पण लोकसभा निवडणुकीनंतर तर ते नक्की मंत्री होणार आहे”-नवाज कुरेशी,अध्यक्ष,कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस.



हज यात्रा ही मुस्लिम लोकांची यात्रा मानली आहे.ही यात्रा अल-हिज्जाह्‌ या महिन्यामध्ये सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र शहरी भरते.शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी असा कुरानमध्ये आदेश आहे.ही एक पवित्र यात्रा मानली जाते.त्यामुळे प्रत्येक मुसलमानाचे स्वप्न असते.देशभरातून हजारो नव्हे लाखो मुसलमान या यात्रेला जातात कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.या महिलांसह ६० भाविकांच्या जथ्याला निरोप देण्यासाठी आज कोपरगाव चे आ.आशुतोष काळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छीन्द्र बर्डे,मौलाना असिफ,मौलाना रिजवान,मौलाना निसार,मौलाना हापिज बशीर,जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष कृष्णा आढाव,शहराध्यक्ष सुनील गंगुले,माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,मंदार पहाडे,बाळासाहेब आढाव,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी बांधकाम  सभापती शिवाजी खांडेकर,मौलाना माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,फकीर कुरेशी,रमेश गवळी,आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”मुस्लिम समाजाने मागील निवडणुकीत मोठे पाठबळ पुरवले त्यामुळे आपण निवडून आणले त्यामुळे तालुक्याचे काही विकासकामे केली असल्याचे सांगितले आहे.भविष्यात आपण हे पाठबळ पुरवाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.व शेवटी      
  “मुबारक हो हज का सफर; दुआवो मे याद रखना”
हा शेर ऐकवून आपले भाषण संपवले आहे.

त्यावेळी चैताली काळे यांनी प्राचार्य नूर शेख यांनी हज यात्रेतून आणलेले जमजम व खजूर आणल्याची गोड आठवण सांगितली आहे.व उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या आहे.

सदर प्रसंगी प्राचार्य नूर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून आ.काळे यांच्या कार्याचे गुणगान केले आहे.

यावेळी असिफ मौलाना यांनी उपस्थितांना मार्गदशन करताना त्यांनी ज्यांना ईश्वराने भरपूर संपत्ती दिली त्यांनी दिन दुबळ्याना मदत करण्याचे कर्तव्य असते.जो हज यात्रा करतो तो नव बालकासारखा पवित्र मानला जात असल्याचे शेवटी सांगितले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाज कुरेशी यांनी प्रास्ताविक केले तर आभार रियाज सर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close