जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात दोन गटात तुंबळ हाणामारी,११ पेक्षा अधिक आरोपींवर गुन्हा 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहरातील कायम वादग्रस्त असलेल्या गांधीनगर उपनगरात काल रात्री ०९ वाजच्या सुमारास हातात लाकडी दांडके आणि बेल्ट घेऊन तरुणांचे दोन गट आमने-सामने येऊन त्यांनी तुंबळ हाणामारी केली असून यात तरुण जितेंद्र अशोक खांडेकर यास जखमी केले असल्याची माहिती हाती आली आहे.या प्रकरणी आरिफ मुहंमद पठाण यांचेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांचेसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणांत आणली आहे.

   

दरम्यान सदर प्रकरण खूप मोठे असल्याची माहिती असून या गंभीर घटनेत दोन गटातील वादाचे मोठे अनेक कंगोरे असल्याची माहिती पुढे आली आहे.त्यात एक अल्पसंख्याक तरुणांचे अपहरण करून त्यास धारणगाव रोड परिसरात शुभमनगरनजीक असलेल्या निर्जन ठिकाणी मोठी हाणामार झाल्याची माहिती आहे.त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने शांतता समितीची बैठक बोलावली असल्याची माहिती आहे.पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

  कोपरगाव शहरात गांधीनगर,एकशे पाच हनुमान नगर,सुभाषनगर,खडकी,खडकीनाका आदि ठिकाणे कायम संवेदनशील मानली जातात.किरकोळ कारणावरुन एक अल्प संख्यांक तर दुसरा बहुसंख्याक गट आमने सामने येतात व त्यातून शहरातील शांती भंग करताना दिसून येत आहे.परिणामी या उपनगरातील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वावरावे लागत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.अशीच घटना बुधवार दि.२२ मे रोजी म्हणजेच काल रात्री ०९ वाजेच्या सुमारास घडली आहे.

  या प्रकरणी फिर्यादी महिला सुनीता रमेश भोपे (वय-४७) रा.हनुमाननगर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपला मुलगा बंटी भोपे यांचेबरोबर झालेल्या भांडणाचे कारणावरुन त्याला शोधण्यासाठी आरोपी आरिफ मुहंमद पठाण,युसूफ शेख उर्फ डल्ली,तन्वीर शेख,मंडी फिरोज,अमजद मणियार,आवेश मणियार सर्व रा.कोपरगाव व इतर अनेक अनोळखी इसम आदींनी
लाकडी दांडा व बेल्ट घेऊन आपल्या घरासमोर आले होते.त्यांनी घरासमोर येऊन आपल्याला शिवीगाळ करून दंम दाटी करून धक्काबुक्की करून बळजबरीने आपल्या घरात घुसून आपला मुलगा बंटी भोपे यांस जीवे ठार मारणार असल्याची धमकी दिली आहे.व आपल्या मुलाचा मित्र जितेंद्र खांडेकर यास देखील लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी अमीर मोहंमद पठाण (वय-२७) रा.हनुमाननगर याने म्हटले आहे की,”आपण भाचीचे लग्न असल्याने बाहेरगावी होती.त्यावेळी सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास आपला भाऊ रफिक पठाण हा साईटवर कामावर असताना त्या ठिकाणी आरोपी सनी गायकवाड,बंटी रमेश भोपे,निलेश दादा पवार,जितू खांडेकर,राहुल जोगदंड आदींनी मोटार सायकलवर येऊन त्यांनी आपल्या भावास म्हणाले की,”आपले तुझ्याकडे काम आहे; तू ब्रिजलाल नगर येथे चाल”असे म्हणवून त्यास आपला विरोध असताना उचलून नेले व त्यास मोकळ्या प्लॉटिंगच्या जागेत घेऊन त्याचे कपडे काढून वरील आरोपींनी लाथाबुक्क्यांनी,गालावर,पाठीवर,पोटात मारहाण करून जखमी केले आहे.व “याबाबत तू पोलिसांना याबाबत माहिती दिली तर तुला भोकसून टाकू” असा सज्जड दम दिला आहे.

   दरम्यान फिर्यादीचे भावाने त्यास आधी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व नंतर शिर्डी साईबाबा रुग्णालय व त्यांनतर लोणी येथील ग्रामीण रुग्णलयात उपचारार्थ भरती केले आहे.

  
   दरम्यान घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने,शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी,सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्वास पावरा,मयूर भामरे,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट देऊन पाहणी केली व परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   दरम्यान या प्रकरणी फिर्यादी महिला सुनीता भोपे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.२४२/२०२४ भा.द.वि.कलम ४५२,३२४,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे आरोपी व त्याचे सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तर विरोधी गटानेही फिर्यादी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मात्र त्याचा तपशील पोलिसांकडून मिळू शकला नाही.व त्याबाबत संपर्क स्थापित होऊ शकला नाही.मात्र प्रकरण खूप मोठे असल्याची माहिती असून या गंभीर घटनेत दोन्ही- गटातील वादाचे मोठे अनेक कंगोरे असल्याची माहिती पुढे आली आहे.त्यात एक अल्पसंख्याक तरुणांचे अपहरण करून त्यास धारणगाव रोड परिसरात शुभमनगरनजीक असलेल्या निर्जन ठिकाणी मोठी हाणामार झाल्याची माहिती आहे.त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने शांतता समितीची बैठक आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास बोलावली असल्याची माहिती पुढे आली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.बाबासाहेब कोरेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close