धार्मिक
कोपरगावात…या अभिनेत्रीची हजेरी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातून दरवर्षी रामनवमीच्या दिवशी कोपरगाव-शिर्डी साई पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. प्रभू श्रीरामचंद्र व साई बाबांच्या नावाचा जयघोष करीत रवाना होणाऱ्या या पालखी सोहळ्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून व मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने यावर्षी प्रसिद्ध रामायण मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिपिका चिखलिया शुक्रतीर्थ मारुती मंदिर,मोहनीराजनगर याठिकाणी सायंकाळी ०५ वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती कोपरगाव-शिर्डी साई पालखी सोहळ्याच्या आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

राम नवमीच्या निमित्तानं कोपरगाव येथून पायी दिंडी शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनास जात असते.या वर्षी आलेल्या भाविकांना माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या दिपीका चिखलिया यांना भेटविण्याचा योग जुळवून आणला आहे.त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सहकार्य केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
रामानंद सागर यांची रामायण ही मालिका १९८७ साली मध्ये प्रसारित झाली होती.त्यावेळी या मालिकेने शहरातील व गावातील रस्ते बंद करण्याची किमया केली होती इतकी तिची लोकप्रियता शिखरावर होती.लॉकडाऊनमध्ये देखील ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.’रामायण’ मालिकेतील संगीत लोक आजही आवडीनं ऐकतात.या मालिकेला संगीत रवींद्र जैन यांनी दिले आहे.आता ‘रामायण’ ही मालिका पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असल्याचे दिसून येते.या मालिकेत सीता मातेची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्री म्हणून दिपिका चिखलिया या खूपच लोकप्रिय ठरल्या होत्या.
वर्तमानात कोपरगावात मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने शिव महापुराण सुरु असून त्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.राम नवमीच्या निमित्तानं कोपरगाव येथून पायी दिंडी शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनास जात असते.या वर्षी आलेल्या भाविकांना माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या दिपीका चिखलिया यांना भेटविण्याचा योग जुळवून आणला आहे.त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सहकार्य केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे भाविकांची गर्दी होणार हे ओघाने आलेच.त्यामुळे अधिकचे गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी मुंबादेवी तरुण मंडळ आणि कोपरगाव पोलिसांची वाढणार आहे.