धार्मिक
श्री विष्णू पुराण कथेचे ध्वजारोहण संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील साई गाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुण्याचे प्रसिद्ध कथाकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या सुस्राव्य वाणीतून तहसील मैदान येथे संत ज्ञानेश्वर नगरीत दि.०९ एप्रिल रोजी आयोजन केले असून त्याचे आज ध्वजारोहण कोपरगाव बेट येथील जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे.
पौराणिक ग्रंथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या श्री विष्णू पुराण या ग्रंथाचे कथेचे गुडीपाडवा मंगळवार दि.०९ एप्रिल ते १६ एप्रिल रोजी साई गाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुण्याचे प्रसिद्ध कथाकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या सुस्राव्य वाणीतून तहसील मैदान येथे संत ज्ञानेश्वर नगरीत दि.०९ एप्रिल रोजी आयोजन केले असून त्याचे आज ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
दरम्यान या ध्वजाचे विधिवत पूजन मुंबादेवी मित्र मंडळाच्या या ज्ञानयज्ञात गत वीस वर्षांपासून तह्यात योगदान देणारे कार्यकर्ते रवींद्र जाधव,निलेश गवळी,प्रितेश केकाण,प्रवीण कुडके,अरविंद मंडलिक,प्रदीप भंडारी,राहुल भागवत,सुरेंद्र जाधव,अभय पाटील,ऍड.संजय जाधव,प्रकाश भडकवाडे,अनिल देसाई,राजेंद्र दिक्षित,प्रवीण गुजराथी आदींच्या धर्मपत्नीसह हस्ते ध्वजारोहण पूजन मान्यवर ब्राम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात संपन्न झाले आहे.
सदर प्रसंगी गोदावरी परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र परजणे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माजी गट नेते विरेन बोरावके,बांधकाम विभागाचे माजी सभापती संजय जगताप,माजी नगरसेवक गणेश आढाव,मंदार पहाडे,स्वप्नील निखाडे,संतोष चव्हाण,वैभव आढाव,आदींसह मुंबादेवी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड,अनिल जाधव,डॉ.अनिरुद्ध काळे आदींसह बहुसंख्य नागरिक व भाविक उपस्थित होते.
दरम्यान या उपक्रमात गेली १४ वर्षे घरोघरी मंत्र जप कार्ड वितरित करणारे निलेश गवळी,साई चरण घरोघरी या उपक्रमात वर्षानुवर्षे सतत ५३ दिवस सेवा करणारे रवींद्र जाधव,प्रितेश केकाण,प्रसिद्ध वास्तू तज्ञ प्रवीण कुडके,महाप्रसाद व्यवस्थापन करणारे अरविंद मंडलिक,प्रदीप भंडारी व प्रकाश भडकवाडे,आलेल्या कथाकारांचे व्यवस्थापन करणारे जेष्ठ स्वयंसेवक सुरेन्द्र जाधव,अनिल देसाई,एक दिवसीय साई पारायण नाव नोंदणी व शासकीय परवानगी सेवा करणारे अड्.संजय जाधव दिवसभर पारायण कशात अविरत सेवा देणारे राहुल भागवत,२००३ साली चांदीच्या पालखीसाठी प्रथम योगदान देणारे प्रवीण गुजराथी,देवीच्या अलंकार संवर्धन ची महत्वाची जबाबदारी घेणारे अभय पाटील आदींचा समावेश आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.