धार्मिक
…या ठिकाणाहून गोदाधाम येथे पायी दिंडीचे आयोजन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर येथून श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचे समाधीस्थान असलेले श्री क्षेत्र सराला बेट (गोदाधाम) येथे पायी दिंडीचे आयोजन यावर्षी सालाबादप्रमाणे केले असल्याची माहिती ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
संत-महापुरुष लोकांना भक्तिमार्ग दाखवतात.ईश्वर आराधनेचा आणि सुखप्राप्तीचा सर्वात सोपा व सरळ मार्ग म्हणजे भक्ती होय.अशी भक्ती करणारे अनेक साधुसंत या भारतात होऊन गेले.महाराष्ट्र तर संतांची भूमी आहे. या संतमालिकेत अठराव्या शतकात योगिराज श्रीगंगागिरी महाराज झाले.महाराजांकडून संकुचित वृत्तीच्या लोकांना ‘वसुधैव कुटुंबकम्’चे शिक्षण दिले जात होते.सहिष्णुता,दया,क्षमा,परोपकार,समदृष्टी,अन्नदान,नाम माहात्म्य आदी मानवी मूल्यांची जोपासना करण्याकरिता स्वत: आचरण करून लोकांना प्रेरणा दिली होती.आज दोन शतकानंतर या ठिकाणी तीर्थंक्षेत्राचे रूप आले आहे.
दरम्यान दर नागपंचमीस मोठा हरींनाम सप्ताह हा भारत प्रसिद्धी पावला आहे.या ठिकाणी संत गंगागिरीजी महाराज यांचा मोठा धार्मिक वारसा संत नारायणगिरीजी महाराज यांनी जवळपास सात दशकाहून अधिक काळ चालवला होता.त्यांची पंधरावी पुण्यतिथी आगामी ०२ एप्रिल रोजी महंत रामगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.त्यासाठी श्री रोकडेश्वर हनुमान मंदिर श्री क्षेत्र भऊर येथून पायी दिंडीचे आयोजन संजय महाराज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली केले असल्याची माहिती आयोजकांकडून प्राप्त झाली आहे.त्यासाठी इच्छुक भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.त्यासाठी मोबाईल संपर्क क्रं.-९८५० २४१२८८,९३०७० ७१५२१,८०१०० ८९१३८ आदीवर संपर्क साधण्याचे आवाहन शेवटी संजय महाराज जगताप यांनी केले आहे.