धार्मिक
…या शहरात ‘श्री विष्णू महापुराण’कथेचे आयोजन
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
पौराणिक ग्रंथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या श्री विष्णू पुराण या ग्रंथाचे कथेचे गुडीपाडवा मंगळवार दि.०९ एप्रिल ते १६ एप्रिल रोजी कोपरगाव येथील साई गाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुण्याचे प्रसिद्ध कथाकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या सुस्राव्य वाणीतून तहसील मैदान येथे संत ज्ञानेश्वर नगरीत आयोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
विष्णु पुराण हे पौराणिक ग्रंथांपैकी एक मानले जाते,ज्यात सुमारे ७ हजार श्लोक आहेत.हे प्रामुख्याने हिंदू देव विष्णू आणि कृष्णासारख्या त्याच्या अवतारांभोवती केंद्रित आहे,परंतु ब्रह्मा आणि शिव यांची स्तुती करते आणि ते विष्णूवर अवलंबून असल्याचे प्रतिपादन करते.पुराण हे सर्वधर्मीय मानले जाते आणि त्यातील कल्पना इतर पुराणांप्रमाणेच,वैदिक विश्वास आणि कल्पनांवर आधारित आहेत.यात विष्णु पुराणातील पहिला सर्ग (भाग) ब्रह्मांडाची उत्पत्ति,देखभाल आणि लय अर्थात नाश यांच्याशी संबंधित विश्वविज्ञान प्रस्तुत करते.रोचर म्हणतात,पौराणिक कथा हिंदू तत्त्वज्ञानाच्या सांख्य दर्शनाशी संबंधित अनेक सिद्धांतांनी विणलेल्या असतात.हिंदू देवता विष्णू यांस या ग्रंथातील विश्वविज्ञानाचा मध्यवर्ती घटक म्हणून प्रस्तुत केले गेले आहे.हरी,जनार्दन,माधव,अच्युत,हृषिकेश आणि इतर सारख्या विष्णूच्या समानार्थी नावांच्या विपुल वापरासह, पहिल्या भागाच्या बावीस अध्यायांमध्ये विष्णूचा आदर आणि उपासना मुक्तीचे साधन म्हणून वर्णन केले आहे.त्यात चारुदत्त आफळे यांचे कीर्तन म्हणेज श्रोत्यांना पर्वणी मानली जात असते.ह.भ.प.चारुदत्त आफळे यांचे वडील गोविंदस्वामी आफळे हे त्यांच्या काळातील १९५०ते १९८० च्या दशकातील प्रमुख कीर्तनकारांपैकी एक मानले जात होते.चारुदत्त आफळे यांनी त्यांच्या कौटुंबिक किर्तनाची मोठी परंपरा पुढे नेली आहे.ते संगीतासह आध्यात्मिक आणि सामाजिक संदेशांची सांगड घालणाऱ्या कथनाला प्रसिद्ध मानले जातात.त्यांनी आपल्या २५ वर्षात त्यांनी ०५ हजाराहून अधिक किर्तने केली आहेत.त्यांच्या किर्तनाला यू-ट्युबवरही अनेक चाहते असल्याचे दिसून आले आहे.त्यांचे किर्तन प्रदर्शन केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील इतर राज्यांमध्ये आणि अगदी यू.एस.ए.,कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया आदी ठिकाणीही झाले आहे.त्यांनी अनेक दूरचित्रवाणी आणि वाहिन्यांवरही सादरीकरण केले आहे.त्यामुळे कोपरगावात त्यांच्या कीर्तनाला मोठी गर्दी होणार हे ओघाने आलेच.या कार्यक्रमास भाविकांना आयोजकाना स्वखर्चाने भाविकांना आणण्याची गरज भासणार नाही असा विश्वास व्यक्त होत आहे.मुंबादेवी तरुण मंडळ आणि साईगाव पालखी सोहळा हा आपल्या चांगल्या आयोजनासाठी व कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे ध्वजारोहण कोपरगाव बेट येथील रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते सोमवार दि.०१ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे.तत्पूर्वी कोपरगाव शहरात साई गाव पालखीच्या वतीने महिलांची दुचाकी फेरीचे आयोजन केले असल्याचे समजते त्यासाठी महिला मोटार उपअधीक्षक माधवी वाघ या उपस्थित राहणार आहे.त्यासाठी दि.०५ एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.त्यासाठी महिला व मुलींना महाराष्ट्राचे वैभव समजल्या जाणाऱ्या नऊवारी साडी परिधान करण्याचे व प्रथम येणाऱ्यास प्रथम सन्मान असे सूत्र ठरवले गेले असल्याचे आवाहन शेवटी केले आहे.