जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आरोपीस अटक 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीस काल बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आरोपी विजय निवृत्ती बर्डे याने १० रुपयांचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संताप जनक घटना उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणी तालुका पोलिसांनी रात्री आरोपीस अटक केली आहे.

  

अल्पवयीन मुलीचे पालक हे मजुरीच्या कामाला गेले असता दुपारी १२.३० ते ०१.०० वाजेच्या सुमारास आरोपी विजय निवृत्ती बर्डे यांने मुलीला १० रुपये घे” असे म्हणून सदर मुलीस त्याच्या घरात बोलावून घेतले व त्याने त्याच्या घराचा आतून दरवाजा लावून सदर मुली सोबत  लैंगिक अत्याचार केला आहे.आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

कायदेशीर प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले,लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा-२०१२ तयार करण्यात आला आहे.हा कायदा तयार करताना बालक प्रथम या तत्त्वाचा अंगीकार करण्यात आला.यामध्ये मुलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने अहवाल देणे,पुराव्याची नोंद करणे आणि खास नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयांच्या मार्फत जलद गतीने खटले चालवणे याचा समावेश करण्यात आला आहे.या नवीन कायद्याद्वारे विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना शिक्षा करता येईल,अशी तरतूद करण्यात आलेली आहे.मात्र तरीही असे  गुन्हे राज्यात कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.अशीच घटना नूकतीच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच उघड झाली आहे.यातील आरोपी विजय बर्डे यास पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ अटक केली आहे.त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात गुरुवार दि.२७ मार्च २०२४ रोजी मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीत मुलीच्या आईने म्हटले आहे की,”आम्ही दोघे पती-पत्नी सकाळी १० वाजता मोलमजुरीच्या कामासाठी गेलो असतांना आम्ही आमच्या मुलीला आमची भावजय व आजोबा यांच्या घरी सोडून मजुरीच्या कामाला गेलो असता दुपारी १२.३० ते ०१.०० वाजेच्या सुमारास माझी मुलगी वय ७ वर्ष , इसम विजय निवृत्ती बर्डे यांने मुलीला १० रुपये घे” असे म्हणून सदर मुलीस त्याच्या घरात बोलावून घेतले व त्याने त्याच्या घराचा आतून दरवाजा लावून सदर मुली सोबत  लैंगिक अत्याचार केला तो लैंगिक अत्याचार करत असतांना पीडित मुलीच्या मामीने सदर पिडितेला आवाज दिला असता त्या नराधमाने त्या मुलीला,”ओरडू नको” असा दम दिला सदर मुलीच्या आईला सदर घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळतात सदर पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने,तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संदीप कोळी,उपनिरीक्षक मनोज महाजन आदींनी भेट दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१०९/२०२४ भा.द.वि कलम ३७६ ए-बी, ५०६,सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सदर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.सदर आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.सदर घटनेची चौकशी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरिष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे अधिक तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close