धार्मिक
…या राजकीय नेत्याने घेतले साई दर्शन !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांनी नुकतेच श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे,मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
शिर्डीतील साईबाबांची महती सतासामुद्रा पार गेली आहे.त्यामुळे जगातील बहुतांशी देशातील साई भक्त शिर्डीत साई समाधीवर लिन होण्यासाठी येत असतात त्यात देश पातळीवरील प्रसिद्ध राजकारणी,क्रीडापटू,सिनेअभिनेते,अभिनेत्री,नाटककार,लेखक,दिग्दर्शक,प्रशासकीय अधिकारी आदींचा समावेश असतो.
खा.सुप्रिया सुळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यांनी त्यांचा सत्कार केला आहे.त्यावेळी नवोदित राष्ट्रवादीचे प्रवक्ते संदीप वर्पे उपस्थित होते.
यावेळी मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.