धार्मिक
हिमाचलचे उपमुख्यमंत्री यांनी कोपरगावात घेतले…या दैवताचे दर्शन
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
हिमाचल राज्याचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी आज सपत्नीक व सहकुटुंब येऊन कोपरगाव बेट येथील दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिरात येऊन मोठ्या श्रद्धा भावाने दर्शन घेतले आहे.त्यांचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आपल्या विश्वस्तांसह सत्कार केला आहे.
गुरु शुक्राचार्य यांची महती सातासमुद्रापार गेली असून राज्यातून व परप्रांतातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.काही दिवसापूर्वी त्याचे प्रत्यंतर नुकतेच गयानाचे या देशाचे भारतातील राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवास हे नुकतेच येऊन गेले असताना आज दि.३० जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिमाचल राज्याचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी सपत्नीक दर्शन घेतले आहे.
कोपरगाव शहराच्या आग्न्येय दिशेस हाकेच्या अंतरावर देवगुरु ब्रहस्पती व दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र कोपरगाव बेट हे पावन क्षेत्र आहे.त्याच ठिकाणी समुद्र मंथनातून मिळालेले रत्न वाटपावरून देव-दानव युद्ध झाले होते.या युद्धात दानवांना जिवंत करण्यात अहंम भूमिका निभणारी शुक्राचार्यांची ‘संजीवनी विद्या’ बहराला आली होती.या ठिकाणी ऐत्याहसिक ब्रहस्पती पुत्र कच व शुक्राचार्य कन्या देवयानी यांची प्रेम कथा फुलली होती.या ठिकाणीच संजीवनी विद्या शुक्राचार्यांकडून कचाने पळवली होती.त्या ठिकाणी अद्यापही संजीवनी विद्या दिलेला संजीवनी पार अस्तित्वात आहे.याच ठिकाणी गोदावरी नदी काठी प्राचीन शुक्राचार्य मंदिर आहे.त्या ठिकाणी राज्यातून व परप्रांतातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.वर्तमानात या मंदिराची प्रसिद्धी सातासमुद्रापार गेली असून त्याचे प्रत्यंतर नुकतेच गयानाचे या देशाचे भारतातील राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवास हे नुकतेच येऊन गेले असताना आज दि.३० जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिमाचल राज्याचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी सपत्नीक दर्शन घेतले आहे.त्यांनी या पूर्वी विरोधी पक्षनेते असताना गुरु शुक्राचार्य यांचे दर्शन घेतले होते.
सदर प्रसंगी त्यांच्या पत्नी आस्था अग्निहोत्री,मुलगी नातेवाईक संजीव सैनी आदींसह ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,ट्रस्टचे विश्वस्त विलास आव्हाड,राजेंद्र पंडोरे,भागचंद रुईकर,विजय रोहोम,मुन्ना आव्हाड,विलास आव्हाड,विकास शर्मा,बाळासाहेब लकारे,दत्तात्रय सावंत,भाजपचे सोशल मीडिया सेलचे राज्य कार्याध्यक्ष समीर आंबोरे,काँग्रेसचे सरचिटणीस नितीन शिंदे,विजय जाधव,मंदिर प्रमुख सचिन परदेशी,उपप्रमुख प्रसाद पऱ्हे,मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी अग्निहोत्री यांनी दुपारची गुरु श्याक्राचार्य यांची आरती केली असून त्याआधी सपत्नीक पूजाविधी केला आहे.
त्यानंतर अध्यक्ष आव्हाड यांनी त्यांचा शाल,महाराष्ट्रीय फेटा,श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.त्यावेळी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी मंदिराचा व येथील शुक्राचार्यांचा प्राचीन इतिहास कथन केला आहे.
त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे व स्वागत करण्याच्या पद्धतीचे खास कौतुक केले आहे.व सदर कोपरगाव बेट येथील गुरु शुक्राचार्य संस्थानच्या पुस्तिकेत व्यवस्थापनाचे व मंदिराच्या नवनवीन सुधारणा केल्याबद्दल कौतुक केले आहे.