आंदोलन
….येथील महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात द्या-मागणी

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही.ते बौद्धांच्याच ताब्यात असावे,यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून आंदोलन केले जात आहे.अनेक बौद्ध विहारांमध्येही आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले आहे.कोपरगाव येथे सोमवारी रिपब्लिकन पार्टीसह विविध दलित संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बुद्धगया महाबोधी महाविहार हिंदू पंडितांच्या तावडीतून मुक्त करून बौद्धांच्या हातात द्या अशी मागणी करण्यात आली आहे.

सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले.शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली,तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे.मात्र सदर विहार आता बौद्धांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी आता पुढे आली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले.शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली,तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे.बौद्ध अनुयायी भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मंत्र जपणारे बांधव येथे येतात.मात्र, या महाविहाराचे नियंत्रण व व्यवस्थापन आजही बौद्धांच्या नव्हे तर हिंदूच्या ताब्यात आहे.यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई १९९२ पासून आंदोलन करीत आहे.सध्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी राज्यातील सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहे. सोमवारी भिख्खू आनंद सुमनगिरी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
त्यात त्यांनी म्हंटले आहे की,”बोध गया मुक्ती आंदोलनाचा उद्देश हा जागतिक वारसा स्थळाला संघटित करणे व सुरक्षित करणे व आगामी पिढीसाठी संवर्धन करणे असे आहे असा दावा करण्यात आला आहे.देशात मशिदीवर मुस्लिमांचा तर गुरुद्वरावर शिखांचा,चर्चवर ख्रिस्ती लोकांचा,तर हिंदू मंदिरावर हिंदूंचा ताबा असतो तसा बौद्ध गया या ठिकाणी बौद्धांचा अधिकार हवा आहे.त्यामुळे सन-१९४९ बुद्ध गया मंदिर कायदा रद्द करून बोध गया येथील महाबोधी महविहार संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली आहे.
सदर प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य,दिपक गायकवाड,आर.पी.आय.चे माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशुर,दिनकर खरे,माजी नगरसेवक संजय कांबळे,मायादेवी खरे,नानासाहेब मोरे,देवराम पगारे,बाळू गांगुर्डे,अजय विघे,शंकर घोडराव,आकाश नवगिरे,गणेश पवार,दगुजी साबळे,त्रिंबक इंगळे,राजेंद्र उशिरे,अजय पाटील,प्रकाश दुशिंग,शरद खरात,चंद्रकांत खरात,संतोष कोपरे,सुखदेव खंडिझोड आदीं सह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.