जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळ्यास…या नेत्याची भेट,वारकऱ्यांत समाधान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे उत्तर नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या पायी दिंड्यांच्या वारकऱ्यांना भेटी दिल्या असून त्याबाबत वारकऱ्यांनी त्यांच्या या कृतीचे जोरदार स्वागत केले आहे.

‘पंढरीचा वास,चंद्रभागेस्नान,आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.या वाऱ्या दर आषाढीला आवर्जून राज्यभरातून जात असतात तशा नगर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर दिंड्या जात असतात.त्यात अकोले तालुक्यासह शेवटी पूर्वेकडील नेवासा विधानसभा मतदार संघातून दिंड्या मोठ्या प्रमाणावर जात असतात.त्या जवळपास सर्व दिंड्यानी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेटी दिल्या आहेत त्याबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही.तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे.एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय.जो नियमित वारी करतो तो वारकरी.वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.’पंढरीचा वास,चंद्रभागेस्नान,आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.या वाऱ्या दर आषाढीला आवर्जून राज्यभरातून जात असतात तशा नगर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर दिंड्या जात असतात.त्यात अकोले तालुक्यासह शेवटी पूर्वेकडील नेवासा विधानसभा मतदार संघातून दिंड्या मोठ्या प्रमाणावर जात असतात.

यावर्षी कोपरगाव,राहाता,संगमनेर,वैजापूर,श्रीरामपूर,राहुरी,अकोले,नेवासा वैजापूर तालुक्यातील विविध ह.भ.प.महाराज यांचे मार्गदर्शनाखाली दिंड्यानी पावसाचे वातावरण नसताना कूच केले होते.विशेष म्हणजे या वर्षीही पांडुरंगाची कृपा होऊन राज्यात बहुतांशी क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

त्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाची कृपा झाली अशी श्रद्धा अनेक वारकऱ्यांची आहे.प्रारंभी ऊन ‘मी’ म्हणत असताना दिंड्यानी या तीर्थ क्षेत्राकडे कूच केले होते.त्यामुळे या वर्षी दिंड्या जास्त असल्या तरी भाविक कमी दिसून आले आहे.मात्र त्यांची पांडुरंगावरील श्रद्धा मात्र वाखणण्यासारखी होती.मात्र शेवटचे तीन-चार दिवस आकाशात ढगांची गर्दी होऊन पावसाचे वातावरण झाले व उन्हाची काहिली कमी झाली होती.त्यामुळे वारकऱ्यांस दिलासा मिळाला होता.

दरम्यान सालाबादा प्रमाणे याही वर्षी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या सहकांऱ्यासमवेत हजेरी लावली आहे.त्यासाठी त्यांनी सलग दोन दिवस या दिंड्यात हजेरी लावली असून काही ठिकाणी पायी प्रवास केला असून दिंड्यांची हाकहवाल घेतली आहे.तर काही दिंड्यात उपस्थित राहून प्रसाद सेवन केला आहे तर काही ठिकाणी वारकऱ्यासमवेत पायी प्रवास करून वारकऱ्यांचे सुखदुःख जाणून घेतलं आहे.त्यावेळी अनेकांनी त्यांना भावी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान त्यांनी या प्रवासात श्री क्षेत्र सराला बेट येथील महंत रामगिरीजी महाराज यांची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गंगागिरीजी महाराज यांच्या मठात भेट भेटली आहे.व दिंड्याचा हाकहवाल घेतला आहे.दरम्यान त्यांनी या शिवाय अकोले,संगमनेर,राहाता,कोपरगाव,श्रीरामपूर,राहुरी,नेवासा आदी तालुक्यातील दिंड्यांना व भगवत भक्तांना भेटी दिल्या आहेत.
सदर प्रसंगी त्यांचे समवेत सर्व श्री ह.भ.प.आरोटे महाराज,संजय महाराज जगताप,शेटे महाराज,वाकडी,निझरणेश्वर आदी ठिकाणचे अनेक मर्हाजनी समाधान व्यक्त केले आहे.सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,भाऊसाहेब चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close