विविध पक्ष आणि संघटना
चर्मकार महासंघाचे…येथे राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय चर्मकार महासंघ,भारतीय दलित साहित्य अकादमी व रचना सोशल ऑफीसर असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी यांचे दोन दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर उभाडे ता.इगतपुरी येथे दि.८ व ९ एप्रिल रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबन घोलप यांचे अध्यक्षतेखाली होत असुन समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अ.नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष अशोक कानडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये केले आहे.
“या शिबिरात सहकार तसेच शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती,सूतगिरणीची यशोगाथा,लिडकॉमचे बजेट व चर्मकार बांधवांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती,खादीग्रामोद्योगच्या विविध योजनांची माहिती मागासवर्गीय युवकांना उद्योग धंद्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी मागासवर्गीयांच्या संरक्षणासाठी असलेल्या ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी आदी बाबत माहिती दिली जाणार आहे”-दिलीप कानडे,अध्यक्ष उत्तर विभागीय,चर्मकार संघ.
शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी एल पुनिया,अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचे अध्यक्ष सोहनपाल सुमनाक्षर,राज्यसभा सांसद सत्यनारायण जठीयाजी,रचना ऑफीसर्स सोशल असोसिएशनचे डॉ.विठ्ठल दांडगे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इन्द्रेश गजभिये या दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांसह राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार,महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माधवराव गायकवाड चर्मकार समाजजातील सर्व आजी माजी आमदार खासदार यांचे उपस्थितीत हे शिबीर होणार आहे.
या शिबिरात सहकार तसेच शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती,सूतगिरणीची यशोगाथा,लिडकॉमचे बजेट व चर्मकार बांधवांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती,खादीग्रामोद्योगच्या विविध योजनांची माहिती मागासवर्गीय युवकांना उद्योग धंद्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी मागासवर्गीयांच्या संरक्षणासाठी असलेल्या ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी तसेच क्रांतीकारी संत शिरोमणी गुरु राविदास महाराज यांचे क्रांतिकारी जिवन अशा अनेक विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन या शिबिरात होणार आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून माजी मंत्री बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध लढत पीडितांना न्याय मिळवून देत असतात यापुढे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होणार असुन अ.नगर जिल्ह्यात समाजाचे जेष्ठ नेते माजी आ.भाऊसाहेब कांबळे तसेच उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे यांचे मार्गदर्शनाखाली अँड.संतोष कांबळे,युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग,महिला आघाडी अध्यक्ष मनीषा पोटे यांचेसह नेवासा,श्रीरामपूर,कोपरगाव,राहाता,संगमनेर,अकोला असे सर्व तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांना सोबत घेऊन जास्तीत जास्त संख्येने समाजबांधव शिबिरात सहभागी करुन घेणे बाबतीत नियोजन सुरु असल्याचे चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कानडे यांनी शेवटी सांगितले आहे.