जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

सेना आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार-…या नेत्याची घोषणा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

संपर्क प्रमुख होताच बबनराव घोलप यांनी शिर्डी दौरा करत पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधत आढावा बैठक घेतली.लोखंडेंना उत्तर द्यायला शिवसैनिक समर्थ असुन पदाधिकारी नेमणुकांना प्राधान्य देत आहोत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहोत अस मत व्यक्त करत संपर्कप्रमुख होताच शिर्डी लोकसभेसाठी घोलप यांनी,”एकला चलो रे”ची घोषणा दिली आहे.

“खा.लोखंडे एकटेच गेले,आता आपण नगर जिल्ह्यात आल्याने गटतट राहाणार नाहीत.शिर्डी लोकसभा मतदार संघात सेना भक्कम असून कोणतीही गद्दारी होणार नाही.इथे साखर सम्राट असले तरी आता त्यांना मतदान न देता आता आम्हालाच मतदान मिळणार आहे.कोणी शिवसैनिक त्यांच्या दावणीला बांधले गेले असतील तर त्या दावण्या आपण काढून घेऊ”-बबनराव घोलप,माजी मंत्री,शिवसेना.

दरम्यान बबनराव घोलप यांचे शासकीय विश्रामगृह येथे बैठकीसाठी आगमन होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोषात त्यांचे स्वागत केले. उद्धव साहेब तुम आगे बढो,”बबनराव तुम आगे बढो” अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.बंडखोर खा.लोखंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.

सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,माजी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र पठारे,तालुका प्रमुख संजय शिंदे,साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन कोेते,शिवसेना नेते कमलाकर कोते,सुहास वहाडणे, जिल्हा संघटक विजयराव काळे,प्रमोद लबडे,भरत मोरे,कलविंदर दडीयाल,अमर कतारी,माजी नगरसेवक सागर लुटे,भागवत लांडगे,ग्राहक कक्षाचे सिनगर,सुनिल परदेशी आदिंसह उत्तर नगर जिल्हयातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “खा.लोखंडे एकटेच गेले,आता आपण नगर जिल्ह्यात आल्याने गटतट राहाणार नाहीत.शिर्डी लोकसभा मतदार संघात सेना भक्कम असून कोणतीही गद्दारी होणार नाही.इथे साखर सम्राट असले तरी आता त्यांना मतदान न देता आता आम्हालाच मतदान मिळणार आहे.कोणी शिवसैनिक त्यांच्या दावणीला बांधले गेले असतील तर त्या दावण्या आपण काढून घेऊ” असा सुचक इशारा बबनराव घोलप यांनी दिला आहे.

न्यायालयात शिवसेनेचाच विजय होईल.जे फुटले त्यांच्या अजून बारीक ठिकऱ्या होतील.आमचा एकटा वाघ त्यांच्याशी लढत होता म्हणून राऊतांवर कारवाई केली.प्रवक्ते म्हणून त्यांनी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.राऊत म्हणजे न घाबरणारा शिवसैनिक आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत.भाजपचे राष्टीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांसह शिवसेनेला संपवण्याची भाषा भावनेच्या भरात केली असावी.कदाचित आज उद्या खुलासा करतील की मला तसे म्हणायचे असा टोलाही त्यांनी लगावला.धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहाणार आहे.हे स्वर्गीय बाळासाहेबांनी निर्माण केलेले चिन्ह,ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही असा विश्वास घोलप यांनी व्यक्त केला.शिर्डी लोकसभेचे तिकीट कुणाला द्यायचे हे पक्ष ठरविल.निवडून कुणाला द्यायचे हे कार्यकर्ते ठरवतील.संपर्क प्रमुख म्हणून शिवसेना तळागाळात नेण्याची माझी जबाबदारी आहे.शिर्डी लोकसभेसाठी आपण असेल किंवा नसेल मात्र जो असेल तो घोलपच असेल.अद्याप न्यायालयीन अडचणी न सुटल्याने बबनराव घोलप यांनी सूचक वक्तव्य करत बबनराव घोलप यांच्या ऐवजी पुत्र योगेश घोलप शिर्डी लोकसभा लढवणार..? का असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close