जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

…या ठिकाणचे कार्यकर्ते,’प्रहार’ मध्ये दाखल !

न्यूजसेवा

देवळाली प्रवरा-(प्रतिनिधी)


देवळाली प्रवरा येथील शरद भाऊसाहेब खांदे,राहुरी येथील गणेश कैलास कांबळे आणि अनिल दादासाहेब कोकने यांनी,’गांधी जयंती’ निमित्त देवळाली प्रवरा येथील प्रहारच्या कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांचे प्रमुख उपस्थितीत,’प्रहार जनशक्ती’पक्षामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   

“खांदे कांबळे व कोकणे यांचा पक्षांमध्ये प्रवेश झाल्याने तिघांचाही असलेला जनसंपर्क येथील पक्ष वाढीसाठी महत्वाचा ठरणार असून प्रहारचे संस्थापक अध्यक्ष ना.बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांचे सहकार्याने पक्षामध्ये उत्साह संचारला आहे”-आप्पासाहेब ढुस,अध्यक्ष,श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ.

सदर कार्यक्रम प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे,प्रहारचे देवळाली प्रवरा शहर प्रमुख किरण पंडित,प्रहारचे देवळाली प्रवरा शहर संघटक सुनील कदम व प्रकाश वाकळे प्रहारचे दवणगाव शाखाप्रमुख नामदेव साळुंखे,प्रहारचे आंबी रोड शाखाप्रमुख जमशील भाई शेख,संघटक इमरान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

       आप्पासाहेब ढूस यांचे अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरा येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यालयात दुपारी ०४ वा. झालेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना त्यांचे जयंती निमित्त ‘प्रहार’ चे वतीने सर्वांनी अभिवादन केले आहे.


     प्रसंगी बोलताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे यांनी नवीन पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येय धोरणे आणि कार्याची ओळख करून दिली व पक्षामध्ये खांदे,कांबळे आणि कोकणे यांचे स्वागत केले आहे.


      प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अप्पासाहेब ढूस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.सदर प्रसंगी ते म्हणाले की,”खांदे कांबळे व कोकणे यांचा पक्षांमध्ये प्रवेश झाल्याने तिघांचाही असलेला जनसंपर्क येथील पक्ष वाढीसाठी महत्वाचा ठरणार असून प्रहारचे संस्थापक अध्यक्ष ना.बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांचे सहकार्याने पक्षामध्ये सुरू असलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला व मतदार संघात प्रहारचा सूरू असलेला कामाचा आवाका पाहून अनेक नागरीक पक्ष प्रवेश करीत  आहे.उपस्थितांचे प्रहार चे देवळाली प्रवरा शहर प्रमुख किरण पंडित यांनी आभार व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close