विविध पक्ष आणि संघटना
…येथिल भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघाच्या विकास कामांसाठी करत असलेल्या कामावर प्रभावित होऊन मतदार संघातील अनेक गावातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सातत्याने प्रवेश करीत आहेत.आगामी विधानसभा मतदार निवडणुकीत त्यांना साथ देण्यासाठी आंचलगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करत आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते भाजपला सोडून त्यांच्या गोटात प्रवेश करत आहेत.विशेष म्हणजे भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट हा राज्यात एकाच भाजप महायुतीत आहे हे विशेष !
सदर प्रसंगी कालिदास शिंदे,प्रदीप शिंदे,आप्पासाहेब खिरडकर,दादासाहेब जाधव,जब्बार शेख,सबुर शेख,अल्ताफ शेख,अशोक शिंदे,भानुदास शिंदे,नवनाथ शिंदे,भाऊलाल शिंदे,संजय शिंदे,वल्लीम शेख,जैनुद्दीन शेख,रमेश शिंदे, रावसाहेब सुरेश शिंदे,रावसाहेब शिंदे,सुरेश मोटे,रमेश एंडाईत,हरिभाऊ शिंदे,योगेश शिंदे,गोपीनाथ ठोंबरे,भीमराज पांडव,मच्छिन्द्र शिंदे,उस्मान शेख,संजय ठोंबरे,आप्पासाहेब शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,नामदेव शिंदे,बबन खुरसणे,ज्योती शिंदे यांनी प्रवेश केला असल्याचा दावा केला आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रावण आसणे,माजी संचालक संजय आगवन,चांगदेव आगवन,रायभान रोहम,गौतम बँकेचे माजी उपाध्यक्ष अनिल महाले,अशोक शिंदे,ग्रामपंचायत सदस्या संगीता शिंदे,किशोर ठोंबरे,रामेश्वर शिंदे,सोमनाथ जोरवर,प्रवीण चांदर,प्रकाश महाले,किरण कुदळे,विलास मोरे,किरण मोरे,सतीश शिंदे,सुखदेव शिंदे,दादासाहेब बनसोडे,अशोक शिंदे,जब्बार शेख,रामभाऊ शिंदे,शिवाजी शिंदे,विठ्ठल पाठक,भाऊसाहेब शिंदे,लक्ष्मण ठोंबरे,दिलीप शिंदे,गोपीनाथ ठोंबरे,भाऊसाहेब येवले आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.