महाराष्ट्र
नागरिकांच्या…या सूचनासाठी नगर जिल्ह्यात बैठकीचे आयोजन

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या विशेष उपक्रमांतर्गत माहिती व जनसंपर्क विभागाचे भविष्यातील सुधारित व सुलभ धोरण आखले जात आहे.या संदर्भात नागरिकांच्या सूचना व अभिप्राय मिळवण्यासाठी दि.९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा माहिती कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर,प्रशासकीय इमारत, पहिला मजला,अहिल्यानगर येथे बैठक आयोजित केली आहे.नागरिकांनी उपस्थित राहून आपले अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले आहे.

भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला २०४७ पर्यंत विकसित करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२९ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे राज्याचे ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवर ठसा उमटावा यासाठी ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन जाहिर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या १५० दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमात ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात येईल. त्यात दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन अशा टप्प्यांनुसार उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. त्यानुसार शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सुधारित व सुलभ धोरण ठरवले जात आहे. नागरिकांनी या संकल्पनेत आपले योगदान द्यावे व बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.पाटील यांनी केले आहे.