महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राने भारावलेले ‘क्रांतिवीर…!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज चिंचवड,पुणे येथे क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे.

“देशभरातील 12,500 क्रांतिकारकांच्या गाथा शोधून त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे,ही जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेला हा पुढाकार स्तुत्य आहे”- देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाच्या भूमिपूजनामध्ये आणि आता स्मारकाच्या लोकार्पणामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःला भाग्यशाली समजतो.अतिशय सुंदर प्रकारचे स्मारक याठिकाणी तयार करण्यात आले असून यामध्ये तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करण्यात आला आहे. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या जीवनातील 14 प्रसंग या स्मारक येथे पाहायला मिळतात.रेखीव पुतळे आणि दृक-श्राव्य स्वरूपातील डिजिटल माहितीच्या माध्यमातून त्यांच्या बलिदानाची आठवण आणि स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. क्रांतिवीर चापेकर बंधू हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राने भारावले होते, म्हणूनच त्यांनी त्यांच्यावर अनेक पोवाडे रचले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून त्यांना सातत्याने प्रेरणा मिळत होती. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात क्रांतिवीर चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध हा एक वॉटरशेड मोमेंट ठरला, ज्यामुळे संपूर्ण इतिहासाची दिशा बदलली आणि क्रांतिकारकांची एक मोठी पिढी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उभी राहिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देशभरातील 12,500 क्रांतिकारकांच्या गाथा शोधून त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे,ही जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेला हा पुढाकार स्तुत्य आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकासोबत राष्ट्रीय स्मारकाची उभारणी देखील करण्यात येणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून भारताचा संपूर्ण इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवला जाईल.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच, पिंपरी-चिंचवड आणि पुणे क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या स्मारकाला भेट देता यावी, यासाठी आवश्यक व्यवस्था दोन्ही महानगरपालिकांनी कराव्यात, अशी सूचनाही दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार रावल,खा.श्रीरंग बारणे,विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,आ. महेश लांडगे,आ. उमा खापरे,आ. अमित गोरखे,आ. शंकर जगताप,आ. प्रशांत बंब,क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे,रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.