कृषी विभाग
नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदतीसाठीं निकष बदलण्याची गरज-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना कठीण प्रसंगी मदतीसाठी विमा कंपन्यांनी निकष अत्यन्त कठीण लावले जात असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणे कठीण होत आहे.परिणामस्वरूप पिक विमा भरूनही अनेक शेतकरी नुकसान भरपाई मिळत नाही.म्हणून नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पिक विम्याचे निकष बदलण्याची मागणी असल्याची मागणी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून केली आहे.
“विमा कंपन्यांकडे शेतकरी पिक विम्याची रक्कम भरतात.विमा कंपन्या मालामाल होतात मात्र शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची योग्य नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असतात.परिणामस्वरूप तो कर्जाच्या खाईत लोटला जातो हि वास्तव स्थिती आहे.त्यामुळे पिक विम्याचे निकष बदलणे अत्यंत गरजेचे आहे.पिक विमा घेणाऱ्या सर्वच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या नुकसान भरपाई देतात का याचा देखील सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा.
त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”मागील तीन चार वर्षापासून पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.खरीप हंगामात अतिवृष्टी व वेळेवर पाऊस न पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या भीतीपोटी असंख्य शेतकरी पिक विमा भरतात.मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होवून देखील अनेक नुकसानग्रस्त शेतकरी पिक विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहत असून विमा कंपनीचे निकष व जाचक अटी यासाठी कारणीभूत आहेत.
शेतकऱ्यांचे १०० टक्के जरी नुकसान झाले तरी विमा कंपनीकडून हे नुकसान ५० टक्केच ग्राह्य धरले जाते व विमा कंपनीकडून नुकसानीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही.शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत फोन कॉलच्या माध्यमातून विमा कंपनीला द्यावी लागते.परंतु झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरायला वेळ जातो.नुकसान झाल्यामुळे राज्यातून हजारो कॉल विमा कंपनीला करण्यात येत असल्यामुळे विमा कंपनीचा फोन कायम व्यस्त असतो.त्यामुळे सर्वच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती ७२ तासाच्या आत विमा कंपनीकडे पोहोचत नाही.पिक विमा घेतांना सर्व कागद पत्रांची विमा कंपनी पूर्तता करून घेते व नुकसान झाल्यावर देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा कागद पत्रांची पूर्तता करण्यास सांगते.परंतु बहुतांश शेतकऱ्यांकडून कागद पत्रांची पूर्तता होत नाही त्यामुळे नुकसान होवूनही पिक विमा घेतलेला असतांना देखील नुकसानग्रस्त शेतकरी पिक विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहे.
त्याचबरोबर विमा कंपनीने खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक विम्याची नुकसान भरपाई देण्यासाठी पावसाचा खंड,आद्रता व ट्रिगर याबाबत जे निकष लावले आहेत त्या निकषात देखील बदल करणे गरजेचे आहे.विमा कंपन्यांकडे शेतकरी पिक विम्याची रक्कम भरतात.विमा कंपन्या मालामाल होतात मात्र शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची योग्य नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असतात.परिणामस्वरूप तो कर्जाच्या खाईत लोटला जातो हि वास्तव स्थिती आहे.त्यामुळे पिक विम्याचे निकष बदलणे अत्यंत गरजेचे आहे. पिक विमा घेणाऱ्या सर्वच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या नुकसान भरपाई देतात का याचा देखील सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात जे निकष अडचणीचे आहेत अशा निकषांमध्ये बदल करावा.त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल व जास्तीत जास्त शेतकरी पिक विमा घेतील यासाठी पिक विम्याच्या निकषात बदल करून शेतकऱ्यांना सावरण्यास मदत करावी अशी मागणी शेवटी आ. काळे यांनी केली आहे.