कृषी विभाग
अवकाळीने मोठे शेतीचे मोठे नुकसान,पंचनामे करा,शेतकऱ्यांची मागणी

न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने कुंभारी आणि परिसरात उभ्या असलेल्या कांदा गहू,मका,आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून अनेक पिके भुईसपाट झाली असल्याचे दिसून आले आहे.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे कोपरंगाव तालुक्यात अनेक हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालं असल्याचे समोर आले आहे.कोपरगाव शहराच्या पश्चिमेस असलेल्या कुंभारी येथेही हे नुकसान झाले आहे.
या वेळेस उभी असलेले मका पीक पूर्णपणे आडवी झालेली आहे.कुंभारी येथील शेतकरी सतीश चंद्रभान घुले यांची एक हेक्टर मध्ये उभ्या मका पिकाचे नुकसान झाले असून ते पूर्णपणे आडवे पडले आहे.एकीकडे दिवसेंदिवस वाढणारी शेत मजुरी,रासायनिक खतांचे वाढणारे भाव,बी-बियाण्याचे बाजार आणि त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या हाताशी आलेला घास हिसकावून घेण्यात आला आहे.कुंभारी,माहेगाव देशमुख,सोनारी,हिंगणी आदीच्या परिसरामध्ये कालच्या पावसामुळे उभी पिके भुई सपाट झाली आहे आणि या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
या प्रकरणी महसूल विभाग,तालुक्याचा कृषी विभाग आदींनी संयुक्त पाहणी करून नुकसान झालेले पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.