कृषी विभाग
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करा-महत्वपूर्ण मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी काळात रब्बी हंगाम सुरु होत असून या कालखंडात शेतकऱ्यांना विद्युत महावितरण कंपनीने दिवसा ढवळ्या वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना माणूस असल्याची जाणीव करून द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव तालुक्यातील शेतकरी व शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे,पद्मकांत कुदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच विद्युत कंपनीचे उप कार्यकारी अभियंता यांचे कडे नुकतीच केली आहे.

शेतकरी अन्नदाता असताना त्याला शेतमालाला भाव मिळत नाहीच पण त्याला सरकार वीज पुरवठा पूर्ण दाबाने करत नाही.केवळ तोंडी लावण्यासाठी व निवडणूक काढण्यासाठी शेतकऱ्याचा वापर सर्व पक्षीय पुढारी करताना दिसत आहे.त्यामुळे शेतकऱ्यास कोणीही वाली नाही हे वारंवार सिद्ध होत आहे.पंजाब आणि हरियाणात सरकार संपूर्ण वीज मोफत देत असताना राज्यात ती विकतही धड मिळत नाही.त्यामुळे यावर्षीही यात बदल करून शेतकऱ्यांना दिवस व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा अशी मागणी मुळीच वावगी नाही.
रब्बी हंगाम आगामी काळात सुरु होत आहे.अनेक ठिकाणी तर तो सुरु झाला आहे.शेतकऱ्यांची गत खरीप हंगामात अतिरिक्त पावसाने वाट लागली आहे.आगामी रब्बी हंगामाकडे आता त्यांचे संपूर्ण लक्ष लागले आहे.व त्यावरच त्यांची संपूर्ण मदार आहे.मात्र शेतकरी अन्नदाता असताना त्याला शेतमालाला भाव मिळत नाहीच पण त्याला सरकार वीज पुरवठा पूर्ण दाबाने करत नाही.केवळ तोंडी लावण्यासाठी व निवडणूक काढण्यासाठी शेतकऱ्याचा वापर सर्व पक्षीय पुढारी करताना दिसत आहे.त्यामुळे शेतकऱ्यास कोणीही वाली नाही हे वारंवार सिद्ध होत आहे.पंजाब आणि हरियाणात सरकार संपूर्ण वीज मोफत देत असताना राज्यात ती विकतही धड मिळत नाही.त्यामुळे यावर्षीही यात बदल करून शेतकऱ्यांना दिवस व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा अशी मागणी मुळीच वावगी नाही.मात्र त्याकडे पुरेसे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही.गत दोन वर्षांपासून पाऊसमाण बरे आहे.मात्र त्यातले त्यात मोठया पिकात बिबटे,लांडगे,कोल्हे,उदमांजर आदी श्वापदे व सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आपला जीव मुठीत धरून शेतीला पाणी आणि मशागत करावी लागत आहे.त्यातच विद्युत मंडळ कधीच शेतकऱ्याला पूरेसी वीज पूर्ण दाबाने देत नाही.त्यामुळे पाणी असूनही पिके काढण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे.त्यामुळे माहावितारांची अवस्था,’असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने किमान दहा-बारा तास वीज मिळावी आणि ती दिवसा मिळावी अशी मागणी प्रवीण शिंदे,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,अनिल शेवते,तुषार विध्वंस,संतोष गंगवाल,नितीन शिंदे,अड्.नितीन पोळ,नंदकुमार बोरावके,कैलास देवकर,विलास पांढरे,सुरेश देवकर,हेमंत गिरमे,शुभम नवले,अमित टिळेकर,गिरीधर पवार आदींनी केली आहे.



