कृषी विभाग
…या किसान’ योजनेची ३१ जूलै पर्यंत ‘केवायसी’ भरण्याचे आवाहन
न्यूजसेवा
अ,’नगर-(प्रतिनिधी)
‘पीएम किसान’ योजनेचा लाभ घेत असलेल्या मात्र अद्याप ‘केवायसी’ (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जूलै पर्यंत ‘केवायसी’ ऑनलाईन करून घ्यावी.अन्यथा ‘केवायसी’ अभावी या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते असे आवाहन ‘पीएम किसान’ योजनेचे जिल्हा समन्वयक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे नुकतेच केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ऑनलाईन’केवायसी’ करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम ‘मे २०२२’ पर्यंत राबविण्यात आली होती.या मोहीमेस ३१ जूलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मात्र अद्यापही जिल्ह्यातील ४१.११ टक्के लाभार्थ्याची ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फॉर्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅब मध्ये किंवा ‘पीएम किसान’ अॅपमध्ये ओटीपी द्वारे लाभार्थीना स्वतः केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ‘ग्राहक सेवा केंद्रा’वर १५ रूपयांच्या नाममात्र शुल्कात ‘केवायसी’ बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल असे आवाहनही श्री.निचित यांनी शेवटी केले आहे.