कृषी विभाग
कांदा साठवणुकीचे भारतीय पेटंट अश्वमेध कडे-डॉ.वाघचौरे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतात कांदा साठवणुकीच्या प्रश्न गंभीर होता त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळण्यास अडचण येत होती.मात्र आता दीर्घ काळ कांदा साठवणुकीसाठी कोपरगाव येथील अश्वमेध ऍग्रोटेक कंपणीने “डेसिकेटर” हे उत्पादन संशोधन करून त्याचे पेटंट मिळवल्याने हा प्रश्न निकाली निघाला असून आता शेतकरी किमान पाच महिने आपला कांदा साठवणूक करून ठेवू शकणार असल्याने प्रतिपादन कंपनीचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
कांदा नाशवंत असल्याने जास्त काळ टिकत नाही त्यामुळे शेतकरी विविध प्रकारची कीटकनाशके आणि इतर निविष्ठांचा वापर होत होता.कांदा साठविण्यासाठी एकही उत्पादन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नव्हते या प्रमुख समस्येवर डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी संशोधन करून किमान चार ते पाच महिने कांदा साठवणूक करून टिकवता येईल आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी करता येईल यासाठी “डेसिकेटर” हे उत्पादन विकसित केले आहे.
त्या बाबत सविस्तर वृत्त असे की,”भारतीय शेतकऱ्यांचे नगदी पीक कांदा एकाच वेळी काढणीस येते त्यामुळे भाव पडतात आणि मग असा कांदा साठवावाच लागतो.कांदा नाशवंत असल्याने जास्त काळ टिकत नाही त्यामुळे शेतकरी विविध प्रकारची कीटकनाशके आणि इतर निविष्ठांचा वापर होत होता.कांदा साठविण्यासाठी एकही उत्पादन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नव्हते या प्रमुख समस्येवर डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी संशोधन करून किमान चार ते पाच महिने कांदा साठवणूक करून टिकवता येईल आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी करता येईल यासाठी “डेसिकेटर” हे उत्पादन विकसित केले आहे व त्याच्या अनेक चाचण्या घेतल्या आहेत.मागील वर्षी पेटंट मंजुरीसाठी पाठवले होते.ते आता प्रसिद्ध झाले असून कांदा साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादन आता मिळणार आहे.याशिवाय कृषी विभागाकडून देखील डेसीकेटर उत्पादन आणि विक्रीसाठी ‘जी टू ‘ हे प्रमाणपत्र मिळाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना ही उत्पादन सहज उपलब्ध होणार आहे.
कांदा उत्पादन जागतिक स्तरावर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारतातील कांदा लागवडीचे क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रात विस्तारलेले आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कांदा टिकवण्यासाठी या पेटंट मुळे फायदा होणार आहे.पूर्वी कांद्यामध्ये कीटकनाशकाचे अंश मळायचे त्यामुळे युरोप,अमेरिका इकडे कांदा एक्सपोर्ट करण्यासाठी मोठ्या अडचणी यायच्या परंतु आता या देशांमध्ये देखील भारतीय कांदा जाऊ शकतो.मागील वर्षी रशिया व अमेरिकेमध्ये कांदा साठवणुकीत साल्मोनेला हे विषारी जिवाणू आढळल्याने कांदा साठवणूक करनाऱ्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते अशा अनेक राष्ट्रांमधून डेसिकेटेर या उत्पादनाला मागणी वाढत आहे.
मागील वर्षी लॉक डाऊन मध्ये भारतीय कांद्याला योग्य भाव नसल्यामुळे कांदा साठवून ठेवला होता आणि टप्प्याटप्प्याने त्याची विक्री केली आहे.हा साठवणूक केलेला कांदा अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत वेगवेगळ्या देशांमध्ये सुरक्षित पोहोचला आणि त्यामुळे या कांद्याची गुणवत्ता सुधारली व टंचाई मध्ये निर्यात वाढल्यामुळे कांद्याला भाव देखील चांगला मिळाला आहे.
अश्वमेधने शेती आणि मानवी आरोग्य यातील समस्यांवर संशोधन करून आघाडी घेतली आहे याचा फायदा केवळ भारत नाही आंतरराष्ट्रीय शेतकरी समूहाला होत.आहे मागील वर्षी श्रीलंकेमधील कंपनीने अश्वमेधच्या मदतीने करार करून श्रीलंकेमध्ये बायो फर्टीलायझर पहिल्यांदाच विकसित केले आहे त्यामुळे बायो फर्टीलायझर आणि बायो पेस्टिसाइड उत्पादन करणारी अश्वमेध श्रीलंकेमधील पहिली कंपनी ठरली होती.भारतीय बाजारपेठेत “डेसिकेटर” हे कांदा साठवणुकीचे एकमेव उत्पादन हाती आले आहे त्यामुळे कांदा साठवणूक सुखकर होणार आहे.मुळातच हे उत्पादन सेंद्रिय असून विषमुक्त आहे आणि याच्या संशोधनात्मक चाचण्या कांदा संशोधन केंद्र निफाड येथे झाल्या असून याची उपयुक्तता प्रयोगाअंती सिद्ध झाली आहे त्यामुळे कांदा साठवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.