कृषी विभाग
राज्याचे आघाडी सरकार शेतकरी हितकारक-समाधान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. त्यांच्या आदर्श विचारांवर शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी राज्याचे महाविकास आघाडी सरकारची वाटचाल सुरु असून शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ज्या योजना राबविल्या जातात त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात केले आहे.
सदर प्रसंगी शेतकऱ्यांना विविध अनुदानाच्या कृषी औजारांचे तर कोपरगाव पंचायत समिती मार्फत विद्यार्थिनींना दुचाकीची वितरण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे.त्यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरवर्षी एक जुलैला राज्यात कृषी दिवस साजरा करण्यात येत असून ०१ जुलै ते ०७ जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने स्व.वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन विविध कार्यक्रमानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी सभापती कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे, र्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, जि.प.सदस्या सोनाली साबळे, पं.स.सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,रोहिदास होन, राहुल रोहमारे, दिलीप दाने,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, ोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,अविनाश निकम,विठ्ठल जावळे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, पंडित वाघीरे,मनोज सोनवणे,बाळासाहेब साबळे, शैलेश आहेर आदीं प्रमुख मान्यवरांसह शेतकरी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत सर्व व्यवसाय ठप्प होते सर्व काही थांबलेलं होत मात्र बळीराजा थांबला नव्हता. आपल्या जीवाची पर्वा न करता जगाचं पोट भरावं यासाठी शेतकरी आपल्या शेतात राबत होते त्यामुळे शेतकरी सुद्धा कोरोना योद्धे असून शेतकऱ्यांनी नेहमीच समाजाच हित जोपासलं आहे असे गौरवद्गार काढले. यावेळी आ.काळे यांच्या हस्ते मान्यवर शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
सदर प्रसंगी शेतकऱ्यांना विविध अनुदानाच्या कृषी औजारांचे तर कोपरगाव पंचायत समिती मार्फत विद्यार्थिनींना दुचाकीची वितरण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे.त्यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.