जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी प्राप्त- माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

दळणवळणाच्या दृष्टीने मतदार संघातील सर्वच मुख्य रस्त्यांचा विकास करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी मुख्य रस्त्यांसाठी मिळविला आहे.नागरिकांना मुख्य रस्त्यांपर्यंत जाण्यासाठी वाड्यावस्त्यांवरचे रस्ते देखील विकसित होणे गरजेचे असून त्यासाठी मुख्य रस्त्यांबरोबरच वाड्यावस्त्यांच्या रस्त्यांचा देखील विकास करणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

दरम्यान ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत अठरा लाख रुपये खर्चाचे ग्रामपंचायत कार्यालय बांधून पूर्ण झाले असताना त्या कामाचे उदघाटन करण्याचा राष्ट्रवादीच्या पंचायत समितीचे एक सदस्य व कार्यकर्त्यांनी घाट घातला असल्याची भणक तेथील भाजप समर्थक कार्यकर्त्यांना व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना लागली असता त्यांनी या घटनेला हरकत घेतली व आ.काळे यांचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन दिवसभर बसल्याने आ.काळे यांना आपला कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढवली असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.

कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून खिर्डी गणेश ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आलेल्या निंबाळकर वस्ती ते जुने गावठाण रस्त्याच्या खडिकरण कामाचे लोकार्पण तसेच भास्कर वस्ती जिल्हा परिषद शाळा ते लोणार वस्ती रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण आ. काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.सदर प्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कारभारी आगवन,बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले,कोळगाव थडीच्या सरपंच मीनल गवळी,उपसरपंच सुनील चव्हाण,खिर्डी गणेशच्या सरपंच सरला चांदर,माधवराव जाधव,बाबुराव निंबाळकर,नानासाहेब रोहोम,वसंतराव लोखंडे,संजय लोखंडे,दिलीप भास्कर,रामदास केकाण,रवींद्र चिंचपुरे,डॉ. कणसे,अमित चिंचपुरे,विक्रम भास्कर,कैलास लूटे,राजेंद्र गवळी,चंद्रशेखर गवळी,नंदकिशोर निंबाळकर,विलास निंबाळकर,पंचायत समिती शाखा अभियंता लाटे,अभियंता दिघे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.त्या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मतदार संघाचा विकास साधण्यासाठी सर्व रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्यांना जोडणारे गावागावातील व वाड्यावस्त्यांवरचे रस्ते विकसित झाल्यास नागरिकांच्या अडचणी कमी होणार आहे. त्या दृष्टीने रस्त्यांसाठी अधिक निधी कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे आदिवासी नागरिकांना तसेच कोळगाव थडी,कोळपेवाडी या गावातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी नियमित वापर असलेल्या रस्त्यासाठी आ.काळे यांनी निधी देऊन या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे.तसेच खिर्डी गणेश येथे देखील भास्कर वस्ती जिल्हा परिषद शाळा ते लोणार वस्ती या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची अनेक वर्षापासूनची रस्ता व्हावा अशी मागणी होती मात्र ती मागणी पूर्ण झालेली नव्हती. त्या रस्त्यासाठी देखील निधी देऊन या रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून आ.काळे यांचे आभार मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close