कोपरगाव तालुका
कोपरगावातील डॉक्टरांचे कोरोना लढाईतील योगदान दखलपात्र-कौतुक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहर व तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांचे जीव वाचविण्यात केलेली कामगिरी नक्कीच दखलपात्र असून त्यांचे कार्य नक्कीच स्पृहणीय असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
डॉ.अजय गर्जे यांनी तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या कोविड योद्धयांचा सरकारात खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा,परिचारिका,अंगणवाडी व आशा सेविका,समावेश केला नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.व उपचार करणाऱ्या डॉक्टरवर व दवाखान्यावर हल्ले होतात असे म्हणून त्यांनी तोडफोडीबद्दल त्यांनी नगरसेवक मेहमूद सय्यद यांचेकडे पाहून मिश्किल टिपणी केली आहे.त्यावेळी उपस्थितांत हशा पिकला त्याला आ.काळे यांनीही दाद दिली आहे.
राष्ट्रीय डॉक्टर दिन दरवर्षी एक जुलै रोजी देशभरात साजरा केला जातो. हा दिवस देशाचे महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा वाढदिवस आणि पुण्यतिथी आहे.त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.कोविड-१९ संसर्गाविरोधातील लढ्यात डॉक्टरांच्या समुदायाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.यावेळीही डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करण्यात गुंतले आहेत.त्याची दाखल घेऊन त्यांचा गौरव आज कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.आशुतोष काळे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केला त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्माकांत कुदळे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, डॉ.अजय गर्जे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. दत्तात्रय मुळे,डॉ. तुषार गलांडे, डॉ. आतिष काळे,डॉ.राजेंद्र रोकडे,डॉ.योगेश कोठारी,डॉ.गणेश ठोंबरे,डॉ.अमोल अजमेरे,डॉ.रवींद्र गायकवाड,डॉ.राजेश माळी डॉ.योगेश लांडे, डॉ.मयुर तिरमखे,डॉ. रमेश सोनवणे,डॉ.नरेंद्र गायकवाड,डॉ.राकेश भल्ला,डॉ.हर्षद आढाव, डॉ.शांताराम आढाव, डॉ.शिवाजीराव रोकडे,डॉ.कुणाल घायतडकर, डॉ.भाग्यश्री घायतडकर, डॉ. वर्षा रोकडे,डॉ.दिपाली आचारी, डॉ.प्रसाद काळवाघे,डॉ.स्वप्नील सोनवणे,डॉ.सालिया पठाण, डॉ.झिया शेख डॉ.अमण रासकर,डॉ.तेजस सोमासे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,आगामी काळात कोरोना साथीची शक्यता असून त्या लाखात जास्त नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्या मुळे आगामी काळात जास्त सतर्क राहावे लागणार आहे.त्याची जबाबदारी अर्थातच डॉक्टर यांचेवर जास्त राहणार आहे.कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याने प्राणवायूचा प्रकल्प उभा केला असून त्यातून प्रतिदिन नवळपास नव्वद मोठे सिलेंडर भरले जातील.व या प्राणवायूचा रुग्णांना लाभ होईल.ग्रामीण रूग्णालयात प्राणवायूचा प्रकल्प उभा केला असून त्यातुंनही प्राणवायूचा पुरवठा होऊ शकेल मात्र आगामी काळात प्राणवायू साठवण क्षमता वाढविण्याची गरज असून मोठ्या रुग्णालयांनी ती वाढविण्याची गरज आहे.ग्रामीण रुग्णालयात आपण तीस खाटांवरून रुग्णसंख्या आता शंहर खाटांवर वाढवली आहे.उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळवली आहे.त्यातून अधिकारी व कर्मचारी संख्या वाढून त्याचा लाभ तालुक्यातील रुग्णांस होईल असा आशावादही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.
डॉ.अजय गर्जे यांनी तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या कोविड योद्धयांचा सरकारात खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा,परिचारिका,अंगणवाडी व आशा सेविका,समावेश केला नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.व उपचार करणाऱ्या डॉक्टरवर व दवाखान्यावर हल्ले होतात असे म्हणून त्यांनी तोडफोडीबद्दल त्यांनी नगरसेवक मेहमूद सय्यद यांचेकडे पाहून मिश्किल टिपणी केली आहे.त्यावेळी उपस्थितांत हशा पिकला त्याला आ.काळे यांनीही दाद दिली असून आपल्या भाषणात त्यांनी पुन्हा त्याची पुनुरावृत्ती करून हशा निर्माण केला आहे.त्यावर नगरसेवक सय्यद यांनी तुम्ही माझ्याकडे पाहून का हसता ? असा सवाल उपस्थित केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.चंद्रशेखर आव्हाड यांनी केले तर उपस्थितांना माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,डॉ.दत्तात्रय मूळे,डॉ.योगेश कोठारी,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.उपस्थितांचे आभार राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.तुषार गलांडे यांनी मानले आहे.