कृषी विभाग
आधुनिक काळात नूतन कृषी तंत्रज्ञान वापरणे गरजेचे-आढाव

जनशक्ती न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतिनिधी)
कृषी क्षेत्रात आगामी काळात आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रेरणादायी ठरणार असून तरुण शेतकऱ्यांनी भविष्याचा वेध घेऊन आधुनिक शेतीला या तंत्रज्ञानाची जोड द्यावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“आगामी कृषी हंगामामध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी-स्पर्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवावा तसेच घरगुती साठवण केलेल्या सोयाबीन बियाणे वापरावे”अशोक आढाव,तालुका कृषी अधिकारी.
महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या वतीने राज्यभरात रब्बी हंगाम पीक स्पर्धा आयोजन करण्यात आलेली आहे.कोपरगाव तालुक्यातील हिंगणी शिवारात कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या प्रमुख उपस्थतीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कृषी अधिकारी मनोज सोनवणे,मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन,सरपंच अश्विनीताई पवार,उपसरपंच आशाताई चंदनशिव,पोलीस पाटील कुमार पंडित,पवार ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कुदळे,रामभाऊ पवार,रतन भवर, हिराबाई माळी, बाळासाहेब पवार, मनसुख पवार,भानुदास पवार,सुनिल पवार,धर्मा चंदनशीव,प्रकाश गांगुर्डे, पांडुरंग कुदळे,किरण भाऊ दहे,कृषी पर्यवेक्षक सी.बी.डरांगे,कृषी सहाय्यक निलेश बिबवे,विजय कौर,तुषार वसईकर,संदीप पवार आदीं प्रमुख मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अशोक आढाव यांनी,”कृषी विभागाच्या विविध योजना तसेच पुढील हंगामामध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी-स्पर्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवावा तसेच घरगुती साठवण केलेल्या सोयाबीन बियाणे वापरावे” असे आवाहन केले व ही पीक स्पर्धा कृषी विद्यापीठ व कृषीविभागात विभाग प्रमुख मार्गदर्शनात तंत्रज्ञान वापरून भविष्यात शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे सूतोवाच केले आहे.
सदर प्रसंगी मुख्यपर्यवेक्षक आधिकारी मनोज सोनवणे यांच्या उपस्थितीत धनराज पवार यांच्या शेतावर आदर्श रॅन्डम पद्धतीने पिकाची कापणी मळणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांनी केले तर धनराज पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.