कोपरगाव तालुका
चर्मकार फौंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी सौ.पाचोरे यांची निवड
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशनच्या कोपरगाव तालुका महिला अध्यक्षपदी सुनीता पाचोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांचा सत्कार श्री संत सावता माळी महिला आघाडी महाराष्ट्र राज्य कोपरगाव कार्यअध्यक्ष छाया काळे व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल तसेच श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य वतीने सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी सत्कार करताना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संचालक ज्ञानेश्वर परजणे,संजीवनी पतसंस्था कोपरगाव संचालक राजेंद्र परजणे,विद्यमान संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे,भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव अध्यक्ष व श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष मुकुंद काळे,दीलीप कासार,दीनेश बोरनारे,नवनाथ पाचोरे,अनिल शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
सौ.सुनीता पाचोरे यांचे महिला बचत गट चालविण्याचे कार्य असून महिलांचे संघटन करून त्यांना रोजगारासाठी बचत गट चळवळीत सहभाग घेण्यासाठी सौ.पाचोरे या नेहमी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.त्यांना पुढील कार्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.